.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये गुन्हेगारीचा हैदोस, मध्यरात्री घरात घुसून गोळीबार, भयानक थरार

बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, काल मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाला असून, आरोपी फरार आहेत. यापूर्वी, मस्साजोग येथे सरपंचाची हत्या झाल्याने बीडमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

बीडमध्ये गुन्हेगारीचा हैदोस, मध्यरात्री घरात घुसून गोळीबार, भयानक थरार
बीडमध्ये गुन्हेगारीचा हैदोस, मध्यरात्री घरात घुसून गोळीबार, भयानक थरार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 13, 2024 | 6:17 PM
Share

बीडमध्ये हिंसाचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही. बीडच्या मस्साजोग येथे सरपंचाची क्रूरतेने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्ये जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

विश्वास दादाराव डोंगरे असे जखमीचे नाव आहे. विश्वास डोंगरे आणि अक्षय आठवले यांच्यात जुना वाद आहे. यापूर्वी दोन गटात मारहाणीची घटना घडली होती. याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या इमामपुर रोडवरील घरात घुसून गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये डोंगरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पेठ बीड पोलीस करत आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत.

बीडमधील ‘या’ घटनेमुळे राज्य हादरलं

बीडमधील गुन्हेगारीच्या घटना सध्या सातत्याने चर्चेत येत आहेत. मस्साजोग येथे सरपंचाच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेतील आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांचं आधी अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांची निर्घृणपणे खून केला होता. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर मस्साजोग गावच्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. गावकऱ्यांनी दिवसभर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. तसेच आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण संतोष देशमुख यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता.

यानंतर पोलीस अधिक्षकांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी दोन बड्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. तसेच काही आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा देखील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर