CRIME: बीडमध्ये वेश्या व्यवसाय करणारी ‘आंटी’ अटकेत, एका पीडितेची सुटका, सुधारगृहात रवानगी

बीडमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या, आंटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलेला सध्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे तर पीडित महिलेला सुधारगृहात पाठवण्यात आले.

CRIME: बीडमध्ये वेश्या व्यवसाय करणारी आंटी अटकेत, एका पीडितेची सुटका, सुधारगृहात रवानगी
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 10:29 AM

बीडः शहरातील संभाजीनगर भागात ग्राहकांना बोलावून महिलांकडून वेश्या व्यवसाय (Prostitution) करवून घेणाऱ्या ‘आंटी’ला पोलीसांनी (Beed Police) अटक केली आहे. ऊर्मिला माने ऊर्फ आंटी (Urmila) ही किरायाच्या घरात कुंटणखाना चालवत होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तिच्याविरोधात कारवाई करत 25 नोव्हेंबर रोजी कुंटणखान्यावर छापा टाकला. या कारवाईत घटनास्थळावरून एका पीडितेची सुटकाही करण्यात आली.

डमी ग्राहक पाठवून पोलिसांचा छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संभाजीनगर भागात महिलांकडून वेश्य व्यवसाय करून घेण्याचा प्रकार सुरु असल्याची खबर मिळाली होती. मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने यानुसार पोलीस अधीक्षक आर राजा, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी तीन वाजता छापा टाकला. यासाठी डमी ग्राहक पाठवण्यात आला. फोनवर आंटीने एक हजार रुपये घेण्याचे ठरवले. त्याने घरात जाऊन इशारा करताच अधिकारी धावले. त्यावेळी 40 वर्षीय पीडितेची सुटका करण्यात आली.

आंटी जेरबंद, पीडितेची रवानगी सुधारगृहात

सहाय्यक निरीक्षक सुरेखा धस यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात ऊर्मिला माने हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आंटी व पीडितेला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आंटीला कोठडी कर पीडितेला महिला सुधारगृहात पाठवण्याच आदेश दिले.

इतर बातम्या-

दाटून कंठ येतो, ‘रोखठोक’ बाप लेकीच्या लग्नात हळवा, राहुल देशपांडेंच्या गाण्यानंतर राऊत बंधू भावूक

Vaccination: औरंगाबादेत आता लस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षा, बसचालकांवर कारवाई, वाहन जप्त होणार!