Vaccination: औरंगाबादेत आता लस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षा, बसचालकांवर कारवाई, वाहन जप्त होणार!

औरंगाबाद जिल्हा आणि शहरात लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी नवा नियम काढला असून सोमवारपासून लस न घेतलेल्या रिक्षा व बसचालकांचे वाहन जप्त करण्याचे आदेश आरटीओला देण्यात आले आहेत.

Vaccination: औरंगाबादेत आता लस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षा, बसचालकांवर कारवाई, वाहन जप्त होणार!
औरंगाबादेत आता रिक्षाचालकांनी लस घेतली नसेल तर त्यांचे वाहन जप्त होणार

औरंगाबादः कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची (Vaccination) टक्केवारी वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्हा (District administration) प्रशासनातर्फे दररज नव-नवीन आदेश जारी केले जात आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना लस प्रमाणपत्र असेल तरच प्रवास, पर्यटन, रेशन, पेट्रोल, औषधी आदी सुविधा देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच शहरातील काही पेट्रोलपंपांवर पेट्रोल देण्याची सुविधाही सुरु केली आहे. आता या मोहिमेत आणखी एक पाऊल पुढे जात, लसीचा एकही डोस न घेणारे रिक्षाचालक आणि खासगी बस चालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी (Sunil Chavan) दिले आहेत.

सोमवारपासून धडक कारवाई

सोमवारपासून ज्या रिक्षा तसेच खासगी बस चालकांकडे लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसेल त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कारवाई करण्याच आदेश दिले आहेत. अशा व्यक्तींचे वाहन जप्त करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांचेही लसीकरण आवश्यक असल्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आरटीओमार्फत उद्यापासून ही कारवाई सुरु केली जाईल.

पर्यटन स्थळांचीही पाहणी

ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांवर येणाऱ्या पर्यटकांनाच नव्हे तर तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील व्यावसायिकांना कोरोना लसचा पहिला डोस घेणे बंधनकारक केले आहे. लस नसेल तर प्रवेश तिकिटही देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

इतर बातम्या-

धक्कादायक: 2 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडले, नागरिकांच्या हाती लागताच चांगलाच चोपला, औरंगाबादची घटना

हा ट्रॅप आहे यात अडकू नका… प्रख्यात अभिनेत्री शुभांगी गोखलेंसोबत नेमकं काय घडलं?

 


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI