रिपरिप पाऊस, स्कुटी घेऊन बाहेर पडले.. 1Km गेल्यावर कळलं समोरच्या डिक्कीत साप… बीडमध्ये बाईकस्वाराचा थरकाप…

सध्या पावसाचे दिवस आहेत, बिळात पाणी गेल्यानंतर विविध साप आश्रयाच्या शोधात कोरडी आणि अडचणीची जागा शोधत असतात. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. साप आढळल्यास त्याला मारण्यापेक्षा वनविभाग किंवा प्राणी मित्रांना संपर्क साधावा असे आवाहन प्राणी मित्र सिद्धार्थ सोनावणे यांनी केले आहे.

रिपरिप पाऊस, स्कुटी घेऊन बाहेर पडले.. 1Km गेल्यावर कळलं समोरच्या डिक्कीत साप... बीडमध्ये बाईकस्वाराचा थरकाप...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 3:00 PM

बीड : बीड (Beed) जिल्हामध्ये आज एक धक्कादायक घटना पुढे आलीयं. पुरुषोत्तम तागड हे दूध आणण्यासाठी शेतात गेले होते. तिथे त्यांनी गोट्याच्या बाजूला स्कुटी उभी केली होती. साधारणतः अर्ध्या तासानंतर ते दूध घेऊन घराकडे निघाले. एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या स्कुटीमधून (Scooty) साप बाहेर आला. सुरुवातीला साप लहान दिसला, मात्र गाडी थांबविल्यानंतर साप हळूहळू बाहेर आला तेंव्हा साप (Snake) मोठा असल्याचे दिसून आले. बीडच्या या घडनेची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. साप स्कुटीमध्ये नेमका गेला कसा हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

रस्त्याने जाताना हादरे बसल्याने साप आला बाहेर

शेतात स्कुटी उभी केल्यानंतर साप गाडीत शिरला असल्याचा अंदाजा लावला जातोयं. रस्त्यांनी जाताना काही काळानंतर हादरे बसल्यामुळे साप बाहेर आला. स्कुटीचालकाचे वेळीच लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला. बीड जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतकेच साप विषारी आढळतात. भारतीय नाग, मण्यार, फुरसे, घोणस आदी साप विषारी आहेत तर अजगर, धामण, धूळ नागीण, इरूळा, गवत्या, कवढ्या, तस्कर,चित्रांगनायकुळ, रसल कुकरी, कुकरी, बारका कवड्या, पिवळ्या ठिपक्याचा कवड्या, काळतोंडया, मांडूळ, दुरक्या घोणस हे बिनविषारी साप बीड जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात.

हे सुद्धा वाचा

एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर समजले

सध्या पावसाचे दिवस आहेत, बिळात पाणी गेल्यानंतर विविध साप आश्रयाच्या शोधात कोरडी आणि अडचणीची जागा शोधत असतात. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. साप आढळल्यास त्याला मारण्यापेक्षा वनविभाग किंवा प्राणी मित्रांना संपर्क साधावा असे आवाहन प्राणी मित्र सिद्धार्थ सोनावणे यांनी केले आहे. आजच्या या प्रसंगानंतर बीड जिल्हामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी गाडीवर बसण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा साप गाड्यांमध्ये लपून बसतात.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.