…आता आम्ही गळफास घ्यावा का? ऊस जळाल्याने महिलेचा भावनिक सवाल; महावितरणमुळे फड जळून खाक

| Updated on: Apr 01, 2022 | 11:10 PM

उसाला लागलेल्या या आगीत सगळा ऊस जळून खाक झाल्याने मंदाकिनी किरकटे या महिलेला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्यामुळे जळणाऱ्या उसाकडे बघून त्यांच्याकडे रडण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता.

...आता आम्ही गळफास घ्यावा का? ऊस जळाल्याने महिलेचा भावनिक सवाल; महावितरणमुळे फड जळून खाक
बीडमधील ऊस उत्पादकाचा ऊस आगीत जळून खाक
Image Credit source: TV9
Follow us on

बीडः वाढत्या महागाईने राज्यातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात असतानाच त्याच्यासमोर आता महावितरणाच्या (MSEDCL) गलथान कारभारामुळे संकटाच्या खाईत ढकलण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात (Beed) महावितरणाच्या भोंगळ कारामुळे धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील शेतकऱ्याच्या उसाच्या फडाला आग लागली. उसाला लागलेल्या या आगीत सगळा ऊस (Sugarcane) जळून खाक झाल्याने मंदाकिनी किरकटे या महिलेला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्यामुळे जळणाऱ्या उसाकडे बघून त्यांच्याकडे रडण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता. त्यामुळे जळणाऱ्या उसाकडे बघत त्यांनी याची भरपाई कोण देणार असा सवाल करुन आता आम्ही गळफास घ्यावा असा भावनिक प्रश्नही उपस्थित केला.

मंदाकिनी किरकटे यांच्या नात्यातील एकाचा उभा ऊस महावितरणाच्या गलथान कारभारामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. उसतोडीसाठी उभा असलेला ऊस आगीत जळून खाक झाल्याने, त्यांच्या कुटुंबातील कुणालाच आपल्या भावना आवरत्या आल्या नाहीत. त्यामुळे मंदाकिनी यांनी आता आमच्या या जळालेल्या उसाची भरपाई कोण देणार असं विचारत, आता आम्ही फाशी घ्यावी का असा सवालही उपस्थित केला. ऊस जळत असताना मंदाकिनी यांना आपल्या भावना आवरत्या आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावनाना वाट मोकळी करुन देत त्या रडत होत्या. तो त्यांचा रडतानाचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

ऊस आगीत जळून खाक

मंदाकिनी किरकटे याही उसतोड कामगार आहेत, उसतोडीचे दिवस आले की, उसतोड कामगार आपापल्या गावागावतून त्या स्थलांतर होतात. मंदाकिनी यांच्या जवळच्या नातेवाईकांचा ऊस महावितरणाच्या शॉर्टसर्किटमुळे पेटला त्यामुळे त्यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले. शेतातील सगळा ऊस आगीत जळून खाक झाल्याने त्यांनी आता ही भरपाई कोण देणार असा सवाल करुन आता आम्ही फास घ्यावा असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या

रेल्वे अपघाताला ‘ब्रेक’, दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला ‘कवच’; रेल्वे मंत्र्यांची घोषणा

’10 ते 15 महिन्यात गोव्यात आमचं सरकार’, काँग्रेस आमदार मायकल लोबो यांचा दावा!

देशात पीएनजीच्या किंमतीत 16 टक्क्यांनी वाढ, तर राज्यात साडे तीन रुपयांची घसरण; मुंबईत इतकी असणार ‘किंमत’