AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे अपघाताला ‘ब्रेक’, दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला ‘कवच’; रेल्वे मंत्र्यांची घोषणा

तब्बल तीन हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावर कवचनं सुरक्षित होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तरादरम्यान सभागृहात माहिती दिली.

रेल्वे अपघाताला ‘ब्रेक’, दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला ‘कवच’; रेल्वे मंत्र्यांची घोषणा
रेल्वे कवच
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 10:24 PM
Share

नवी दिल्लीः भारतीय रेल्वेच्या सुरक्षा तंत्रज्ञानाचा अविष्कार मानल्या जाणाऱ्या ‘कवच‘ (Kavach) तंत्रज्ञानानं दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडर जोडला जाणार आहे. तब्बल तीन हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गावर कवचनं सुरक्षित होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तरादरम्यान सभागृहात माहिती दिली. भारतीय रेल्वेची(Indian Railway) सुरक्षितता मध्यवर्ती ठेऊन भारत सरकार आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त प्रयत्नाने तंत्रज्ञान आधारित गोष्टींचा उपयोग रेल्वेसाठी कसा होईल याचे प्रयत्न चालू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून देशात रेल्वे अपघातांचं (Accident) प्रमाण वाढलं आहे. जीवितहानी सोबतच रेल्वेच्या हानीला देखील मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत आहे. भारतीय रेल्वेने नुकतेच कवच तंत्रज्ञान जगासमोर आणलं आहे. एका तंत्रप्रणाली च्या आधारावर कार्य करते.

रेल्वे सुरक्षेचं ‘कवच’:

आधुनिक प्रणालीच्या आधारावर रेल्वे अपघातावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. केंद्रीय रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद मंडळ येथे लिंगमपल्ली-विकाराबाद जंक्शनवर गुल्लागुडा-चिटगिड्डा रेल्वे स्टेशन दरम्यान या कवच कार्यप्रणालीची चाचणी केली. यावेळी रेलवे बोर्ड चे अध्यक्ष आणि सीईओ वी.के. त्रिपाठी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

‘कवच’म्हणजे काय?

भारतीय उद्योग यांच्या मदतीने संशोधन आणि आरेखन विभागाद्वारे स्वदेशी रूपामध्ये विकसित असलेली एटीपी प्रणाली आहे. भारतीय रेल्वे संचालनमध्ये सुरक्षतेचा हेतू लक्षात घेऊन या तंत्र प्रणालीची निर्मिती करण्यात आली त्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेने या कवचाची तपासणी केली. हे कवच संपूर्णपणे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तयार केले गेलेले एक आधुनिक इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे.

‘कवच’ ठळक वैशिष्ट्ये:

• कवचचं एसपीएडी तंत्रज्ञान धोक्याच्या वेळी सिग्नल पार करण्यापासून रेल्वेला ब्रेक लावते. • ड्रायव्हर मशीन इंटरफेस (डीएमआई) / लोको पायलट ऑपरेशन मध्ये सिग्नल दिसल्यावर ट्रेन आवाजाला निरंतर अपडेट करतो. • इंडिकेशन पॅनल (एलपीओसीआईपी) मध्ये सिग्नल दिसल्यावर ट्रेनच्या आवाजात सातत्याने अपडेट देत असतो. • ओवर स्पीडिंग झाल्यावर रेल्वे थांबण्यासाठी स्वयंचलित ब्रेक • कवच मुळे दोन इंजिन एकमेकांना टक्कर देणार नाहीत. • आपत्कालीन परिस्थिती दरम्यान संदेश दिला जाईल • नेटवर्क मॉनिटर सिस्टम च्या माध्यमातून रेल्वेच्या घडणाऱ्या हालचाली घटनेबद्दल थेट प्रक्षेपण केले जाईल.

संबंधित बातम्या

Russia Ukraine war : रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे मोदींनी युद्धबंदीसाठी मांडलं परखड मत, भेटीत आणखी काय चर्चा?

वेलकम इंडिया: विदेशी पर्यटकांना रेड कार्पेट, टूरिझम पॅकेज टॅक्सला कात्री

वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीच्या मृत्यूनंतर जावई, नातवांचाही हक्क! दिल्ली कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.