देशात पीएनजीच्या किंमतीत 16 टक्क्यांनी वाढ, तर राज्यात साडे तीन रुपयांची घसरण; मुंबईत इतकी असणार ‘किंमत’

आयजीएलनं पीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. गौतम बुद्ध नगरमध्ये पीएनजीच्या किंमतीत 5 रुपये 85 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आता पीएनजीचा दर हा चाळीस रुपयांच्या पार गेला आहे.

देशात पीएनजीच्या किंमतीत 16 टक्क्यांनी वाढ, तर राज्यात साडे तीन रुपयांची घसरण; मुंबईत इतकी असणार 'किंमत'
प्रातिनिधीक फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Apr 01, 2022 | 10:10 PM

मुंबईः देशात इंधन दरवाढ सुरु असून महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. ही दरवाढ सुरु असतानाच आज इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून देशांतर्गत पीएनजी गॅस किंमतीमध्ये वाढ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. पीएनजी गॅसची (PNG Gas) किंमत 16.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 5.85 रुपयांनी झाली असून गॅस किंमतीतील वाढ अंशतः वाढ भरुन काढण्यासाठी ही वाढ केली असल्याचे इंद्रप्रस्थकडून (Indraprastha) सांगण्यात आले आहे. पीएनजी गॅस किंमतीमध्ये गौतमबुद्धनगरमध्ये 41.71 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

नॅचरल गॅसच्या (Natural Gas) किंमती वाढ झाल्याचा फटका राजधानी दिल्लीला बसतो आहे. दिल्लीत सीएनजीच्या किंमतीत अल्पशी वाढ नोंदवण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता दिल्लीत सर्वसामान्यांच्या घरातील गॅसचे दरही वाढले आहेत. आयजीएलनं पीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. गौतम बुद्ध नगरमध्ये पीएनजीच्या किंमतीत 5 रुपये 85 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आता पीएनजीचा दर हा चाळीस रुपयांच्या पार गेला आहे. वाढलेल्या दरांमध्ये पीएनजीची किंमत 41 रुपये 71 पैसे इतकी झाली आहे. तर दुसरीकडे सीएनजीची किंमत 60 रुपयांवरुन 60 रुपये 81 पैसे इतकी झाली आहे. नैसर्गिक गॅसच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे सीएनजी सोबतच पीएनजीचे दरही महागले आहेत.


अनेक गोष्टी महागणार

एकीकडे पीएनसी आणि सीएनजीची किंमत वाढली आहे. तर दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतीही तब्बल 250 रुपयांनी वाढ झाली आहे. ऑईन मार्केटिंग कंपन्यांची ही दरवाढ जाहीर केल्यानंतर आता अनेक गोष्टी महाग होण्याची दाट शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढ होत आहे, ही वाढ होत असतानाच आता सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढवल्या गेल्याने गॅस ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.

राज्यात व्हॅट कमी

नुकताच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील जनतेला दिलासा देणारी यासंदर्भातील बातमी म्हणजे व्हॅट कमी करण्यात आल्याने आजपासून सीएनजी आणि पीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत. राज्यात व्हॅट कमी करण्यात आल्याने जीएनजीच्या दरात सहा रुपयांनी तर पीएनजीच्या दरा साडेतीन रुपयांची घसरण झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे दरामध्ये घसरण करण्यात आली असून आता सीएनजीची किंमत मुंबईत 60 रुपये प्रति किलो झाली आहे.

सीएनजीच्या दरात घसरण

राज्यात गॅसवरील व्हॅट कमी करण्यात आल्याने सीएनजीच्या दरात घसरण झाली आहे तर दुसरीकडे व्यावसायिक गॅसच्या दरात प्रति सिलिंडर 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या 1 तारखेलाच गॅसचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

CNG आजपासून 6 रुपयांनी स्वस्त! नेमकी आता किती झाली CNGची किंमत? जाणून घ्या

…तर भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर घसघशीत सूट

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, हॉटेलमधील जेवन महागणार?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें