Sushma Andhare: माझा भाऊ मंत्री होऊ दे, सुषमा अंधारे यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, राजकीय वक्तव्याने चर्चांना उधाण

Sushma Andhare wishes to Dhananjay Mundhe: परळीत दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि सुषमा अंधारे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याविषयी केलेल्या राजकीय वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.

Sushma Andhare: माझा भाऊ मंत्री होऊ दे, सुषमा अंधारे यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, राजकीय वक्तव्याने चर्चांना उधाण
माझा भाऊ मंत्री होऊ दे, सुषमा अंधारे यांच्या धनंजय मुंडेना शुभेच्छा
| Updated on: Nov 12, 2026 | 6:30 AM

Sushma Andhare wishes to Dhananjay Mundhe: परळीतील एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हे दोघे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले.यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या मनोगतात धनंजय मुंडे यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देताना केलेल्या मिश्किल आणि राजकीय वक्तव्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.

इडा-पिडा जाऊ दे आणि भाऊचा राज येऊ दे

Loading...

सुषमा अंधारे म्हणाल्या की, परळीला सत्ता केंद्र असण्याची सवय आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा उल्लेख माजी मंत्री असा करताना काहीतरी वेगळेच वाटते.भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ म्हणून धनंजय मुंडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत.“भाऊ, इडा-पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे,” असे म्हणत त्यांनी पुढे मिश्किलपणे, “मी मात्र इडा-पिडा जाऊ दे आणि भाऊचा राज येऊ दे, असे म्हणेन. पुढच्या दिवाळीला तुमचा उल्लेख मंत्री म्हणूनच करेन,” असे सूचक विधान केले.

सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात एकच चर्चा रंगली. विशेष म्हणजे, राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच अंधारे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या या वक्तव्याला राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

पिपली लाईव्ह होऊ नये

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचे घर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी पिपली लाईव्ह सारखे पिकनिक पॉईंट झाले आहे. असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी लातूर जिल्ह्यातल्या मुरूड इथं आपल्या भावासोबत भाऊबीज साजरी केली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज संत तुकाराम महाराज सहकारी साखर करण्यावर काम करणाऱ्या ऊस तोड मजुरा सोबत भाऊबीज साजरी केली यावेळी पंकजा मुंडे यांनी ऊस तोड महिला मजुरासोबत जेवण बनवण्याचा आंनद लुटला.

धनंजय मुंडेंचे प्रभू वैजनाथला साकडे

परळीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बाजारपेठेत जात व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.यावेळी बोलताना शेतकरी संकटात असल्याचं ते म्हणाले.आज बाजारपेठेतून फिरताना दुष्काळाची दाहकता जाणवत असून शेतकरी संकटात असल्याचं दिसून येते. शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढावे असे साकडे धनंजय मुंडे यांनी वैजनाथ आला घातल्याचा सांगितलं.दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी मुंडे यांच्या समवेत दिसून आलेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us