Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walmik Karad : मोठी बातमी, वाल्मिक कराडचा पाय खोलात; विष्णू चाटेनी दिली ही कबुली, पोलिसांचा अहवाल सांगतो काय?

Vishnu Chate Big Claim About Audio Conversation : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जनता आणि लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे अनेक गुपित समोर येत आहेत. त्यातच खंडणीप्रकरणात विष्णू चाटेच्या कबुलीजबाबामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Walmik Karad : मोठी बातमी, वाल्मिक कराडचा पाय खोलात; विष्णू चाटेनी दिली ही कबुली, पोलिसांचा अहवाल सांगतो काय?
वाल्मिक कराड अडचणीत
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 9:19 AM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, त्यांचा खून आणि पवनचक्की व्यवस्थापनाला दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहे. जनता आणि लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे प्रकरणात पोलिसांना, सीआयडीला कारवाई करणे भाग पडले. 22 दिवसांपासून केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या यंत्रणा हालल्या. आता दोन कोटींच्या खंडणीप्रकरणात विष्णू चाटे याने मोठी कबुली दिली आहे. या कबुलीजबाबामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय दिली कबुली?

मस्साजोग येथे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू होते. येथील पवनचक्की व्यवस्थापनाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात आरोपी विष्णू चाटे याने मोठी कबुली दिली आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते. कराडचे अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणे झाल्याचे चाटे याने चौकशी दरम्यान कबूल केले. सीआयडीने याविषयीचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात हा खुलासा करण्यात आला. या सर्व अपडेटमुळे कराडचा पाय खोलात गेला आहे.

हे सुद्धा वाचा

खंडणीचे प्रकरण तरी काय?

पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनी प्रकल्प अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणात 11 डिसेंबर 2023 रोजी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे तिघे आरोपी आहेत. कराड आणि चाटे हे सध्या सीआयडीच्या कोठडीत आहेत. कराडच्या सुनावणीवेळी सीआयडीने खंडणीप्रकरणातील चाटेचा कबुलीजबाब अहवालात नमूद केला आहे. चाटे यानेच कराडचे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिल्याची कबुली दिल्याचे त्यात म्हटले आहे.

वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना ,व्हाईस सॅम्पल घेणे पोलिसांना आवश्यक होते. कोठडीसाठी हा अहवाल सादर करण्यात आला. आता या कबुलीजबाबाच्या अनुषंगाने पोलीस कराडकडे या सर्व गुन्ह्यांबाबत तपास करतील. त्याने आणखी कोणते गुन्हे केले? किती व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी दिली? सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खूनप्रकरणात त्याचा काय सहभाग आहे? या अनुषंगाने तपास होणार आहे.

आज परभणीत मूक मोर्चा

संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या क्रुरकर्त्यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी आज परभणीत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकार आम्हाला न्याय आणि सुरक्षा द्या नाहीतर शस्त्र परवाने द्या. परळीत कर्मचारी आणि अधिकारी बिंदू नामावलीला छेद देऊन का आणि कुणी नियुक्त केले?आरोपी वाल्मीक कराड वर खुनाचे कलमे लावून त्याला मोक्का का लावला गेला नाही? यासह विविध प्रश्नांचे परभणीच्या चौकात पोस्टर लावण्यात आले आहे.

मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार.
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले.
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल.