गाडी बंद पडली, सुप्रिया सुळे यांचा ताफा पोहोचला, प्रवाशांना काही कळण्याआधीच त्यांनी…

| Updated on: May 27, 2023 | 7:45 PM

भोर तालुका दौऱ्यावर निघालेला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा त्याच रस्त्यावरून पुढे निघाला होता. रस्त्यावर उभ्या प्रवाशांना पाहून सुळे यांनी गाड्या थांबवण्याची सूचना केली. स्वतः गाडीतून उतरून त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली.

गाडी बंद पडली, सुप्रिया सुळे यांचा ताफा पोहोचला, प्रवाशांना काही कळण्याआधीच त्यांनी...
MP SUPRIYA SULE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

विनय जगताप, पुणे : पुणे सातारा महामार्गावर कात्रज घाटात कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात बंद पडते. वरून ऊन, सावलीला थांबावे, तर रस्त्यावर जवळपास कुठे झाड नाही. अशा उन्हाच्या काहिलीत रस्त्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखरं होत धावून गेल्या. दौऱ्यानिमित्त भोरच्या दिशेने निघालेल्या सुळे यांनी स्वतःच्या गाडीसह कार्यकर्ते आणि अन्य वाहनांसह मागून आलेल्या एसटी बसमधून सर्व प्रवाशांना खेड शिवापूर टोल नाका आणि अन्य सावली असलेल्या ठिकाणी पोहोचवले.

दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान सातारा रस्त्यावर शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. पुण्याहून सांगलीकडे निघालेली शिवशाही बस शिंदेवाडी जवळ बंद पडली होती. त्या बसमधील सर्व प्रवाशी महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक उन्हाच्या काहिलीने हैराण होत बसजवळ उभे होते.

हे सुद्धा वाचा

भोर तालुका दौऱ्यावर निघालेला खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा त्याच रस्त्यावरून पुढे निघाला होता. रस्त्यावर उभ्या प्रवाशांना पाहून सुळे यांनी गाड्या थांबवण्याची सूचना केली. स्वतः गाडीतून उतरून त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली.

गाडी बंद पडल्याने ते सर्वजण थांबल्याचे कळताच सुळे यांनी तातडीने हालचाल केली. काही प्रवाशांना स्वतःच्या गाडीत घेतले. काहींना कार्यकर्त्यांच्या गाडीत बसविण्याच्या सूचना दिल्या. मागून काही एसटी गाड्या सातारा रस्त्यावर धावत होत्या. त्यांना थांबण्याची विनंती केली.

सांगली जिल्ह्यातील पेठ येथे निघालेल्या एसटी चालक एस. एस. कदम आणि वाहक आर. व्ही. सोनवणे यांनी खासदार सुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गाडी थांबवली. त्यांनी काही प्रवाशांना आपल्या बसमध्ये सामावून घेतले. या सर्व प्रवाशांना घेऊन ताफ्याने खेड शिवापूर टोल नाका परिसरात सावली असलेल्या ठिकाणी हलवले.

उन्हाने हैराण झालेल्या त्या प्रवाशांसाठी सुळे यांनी पाण्याची व्यवस्था करायला लावली. आणखी काही प्रवाशी मागे राहिले होते. त्यांनाही घेऊन येण्याच्या सुचना आपल्या सोबतच्या पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. सर्व प्रवाशी सुखरूप सावलीत पोहोचले याची खात्री करून खासदरा सुळे पुढे रवाना झाल्या.

काही वेळाने बंद पडलेली शिवशाही बस दुरुस्त होऊन पुढे आली. त्यात बसून सर्व प्रवाशी पुढील प्रवासासाठी रवाना झाले. या प्रसंगानंतर भर उन्हात मायेची पाखर घेऊन धावून आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गाडीतील सर्व प्रवाशांनी भरभरून आभार मानले.

एसटी महामंडळाने गाड्या तपासूनच सोडाव्यात – खा. सुळे

दूरच्या प्रवासाला सोडण्यात येणारी प्रत्येक एसटी बस महामंडळाने तपासूनच पाठवायला हवी, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. महामंडळाच्या गाड्या अचानक नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याचे प्रवासी यांनी सांगितले. त्यावर परीवहन मंत्री महोदयांनी याकडे वैयक्तिक लक्ष घालून प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.