धावत्या एसटी बसचे ब्रेक फेल, त्यानंतर घडलेला तो थरारक प्रसंग प्रवाशांच्या अंगावर शहारे आणणारा…

ही सूचना ऐकूण प्रवाशांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. आता ही बस कुणाला धडकणार तर नाही ना. अशा शंकाकुशंका मनात आल्या.

धावत्या एसटी बसचे ब्रेक फेल, त्यानंतर घडलेला तो थरारक प्रसंग प्रवाशांच्या अंगावर शहारे आणणारा...
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 5:38 PM

गणेश सोनोने, प्रतिनिधी, अकोला : राज्यात काही एसटी बसची हालत अतिशय खराब आहे. कधी बस धूर सोडताना तर कधी बस पेटत असल्याच्या घटना समोर येतात. अशीच एक दुर्घटना अकोला शहरात घडली. यात बसचे ब्रेक फेल झाले. यामुळे चालकाला धक्का बसला. आता बस कशी थांबवायची याचा तो विचार करू लागला. चालकाने प्रवाशांना बसचे ब्रेक फेल झाल्याची सूचना दिली. ही सूचना ऐकूण प्रवाशांच्या जीवाची घालमेल सुरू झाली. आता ही बस कुणाला धडकणार तर नाही ना. अशा शंकाकुशंका मनात आल्या.

akola 1 n

प्रवाशांचा जीव लागला होता टांगणीला

चालकानेही सावधानता पाळली. बस एका पुलियाच्या पीलरला नेऊन ठेवली. यामुळे बस थांबली. यात प्रवाशांचा धक्का बसला. या धक्क्यात ८ प्रवासी जखमी झाले. परंतु, जीव वाचवण्यास चालक यशस्वी झाले. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसंगावधान साधून चालकाने बस थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता. हा अपघात टाळण्यात चालकाची हुशारी कामी आली.

हे सुद्धा वाचा

akola 2 n

आठ प्रवासी जखमी झाले

अकोला शहरातल्या अशोक वाटिका चौकात नेरवरून अकोला येणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाले. तर चालकाच्या समय सूचकतेमुळे गाडीमधील 40 प्रवासांचे जीव वाचले. यात आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बुलढाणा वरून दारवा जाणाऱ्या बसचे अकोला शहरातल्या अशोक वाटिका चौकात ब्रेक फेल झाले.

चालकाची समयसूचकता कामी आली

रस्त्यावर रहदारी असल्याने कुठलाही अपघात होऊ नये, म्हणून चालकाने समसूचकता ठेवली. बसमधील प्रवाशांना सूचना देत उडान पुलाच्या पिल्लरला धडक देऊन बस थांबवली. यात आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमधील 40 प्रवाशांचे जीव वाचवल्याने बस चालकाचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे.

नादुरुस्त बसमुळे चालकांच्या कंबरेचे दुखणे जास्त होते. त्यामुळे काही दिवस चालक म्हणून काम केल्यानंतर काही जणांना कंबर दुखीचा त्रास होणे सुरू होते. शिवाय काही रस्ते नादुरुस्त असल्यामुळे चालकाला त्रास सहन करावा लागतो.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.