महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर; चोमडेपणा, चाटूगिरी म्हणत ‘या’ नेत्यांनी एकमेकांवर साधला निशाणा

| Updated on: May 03, 2023 | 9:19 PM

संजय राऊत यांनी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल वक्तव्य करताना, मल्लिकार्जुन खर्गे हे नाममात्र अध्यक्ष आहेत, सर्व राहुल गांधी संघटना बघतात याचं उदाहरण देवून राऊत यांनी राष्ट्रवादीचं कुणीही अध्यक्ष झालेत तरी, शरद पवारच बघतील असं वक्तव्य केलं होते.

महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर; चोमडेपणा, चाटूगिरी म्हणत या नेत्यांनी एकमेकांवर साधला निशाणा
Follow us on

भंडारा : कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी उडाली असतानाच आता राज्यातील वातावरणही प्रचंड तापले आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र उभा असतानाच महाविकास आघाडीतील बिघाडी आता खासदार संजय राऊत आणि आमदार नाना पटोले यांच्यामुळे उघड झाली आहे. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ जोरदार चालू असतानाच या दोन नेत्यांच्या वक्तव्यामुळे आता आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याला किंमत न देता ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, आम्ही काँग्रेसचे कुठेही नाव घेतले नाही. मात्र, चोमडेपणा आणि चाटूगिरी आम्ही करीत नसून ती कोण करते, हे यापुढे दिसून येणार आहे सा टोला नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

काँग्रेसच्या नेत्यांविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की आम्ही बोललो तर, त्यांना महागात पडेल असं खोचक वक्तव्य संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचं नाव न घेता टोला लगावला होता.

तसेच त्यानंतर नाना पटोले यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्याविषयी बोलताना संजय राऊत यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार करताना म्हणाले की,संजय राऊत हे काही आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत.

संजय राऊत यांनी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल वक्तव्य करताना, मल्लिकार्जुन खर्गे हे नाममात्र अध्यक्ष आहेत, सर्व राहुल गांधी संघटना बघतात याचं उदाहरण देवून राऊत यांनी राष्ट्रवादीचं कुणीही अध्यक्ष झालेत तरी, शरद पवारच बघतील असं वक्तव्य केलं होते.

त्याचा अर्थ काय होतो. म्हणून आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे, ते आमच्या पक्षाचे प्रवक्त्ये नाहीत असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, गांधी परिवारावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यामुळं संजय राऊत यांनी विचार करूनचं बोलावं, असा आमचा असल्याचा सल्लाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.