Tiger News : या जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाघांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांना होतंय जवळून दर्शन, वन विभागाकडून…

महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Jan 26, 2023 | 11:20 AM

शेतात वाघाचा ठिय्या ! शेतकऱ्यांना होतंय दर्शन, दहशत वाढली, तरी सुद्धा वन विभाग...

Tiger News : या जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाघांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांना होतंय जवळून दर्शन, वन विभागाकडून...
शेतकऱ्यांना होतंय दर्शन
Image Credit source: tv9marathi

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाघाचे (Tiger) धुमाकूळ सुरु आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून वाघ शेतकऱ्यांना (Farmer) दिसत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. दिवसाढवळ्या वाघ दिसत असल्यामुळे वाघाची दहशत वाढली आहे. वन विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मोहाडी तालुक्यातील जांब कान्द्री वनपरिक्षेत्राअंतर्गत डोंगरगाव सालई खुर्द रस्त्यावरील हुडकीवर ओमप्रकाश उईके यांना वाघांचे जवळून दर्शन झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तिथल्या परिसरात शेतकरी एकदम घाबरले आहेत.

हुडकीवर ओमप्रकाश उईके यांना वाघांचे जवळून दर्शन झाल्यापासून परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. वाघाची दहशत वाढली असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी मांडेसर परिसरात वाघाने धुमाकूळ घातला होता. बालचंद दमाहे यांच्या मिरचीच्या शेतात पट्टेदार वाघांनी ठिय्या मांडून बसला होता, त्यावेळी त्या वाघाला वन विभागाने रेस्क्यू करून जेरबंद करण्यात यश आले होते.

हे सुद्धा वाचा

मात्र पुन्हा धोप परिसरात चार दिवसांपासून शेतकरी व काही नागरिकांना वाघाचे जवळून दर्शन झाले. धोप येथील संजय शेंडे शेतकरी यांच्या कापसाच्या शेतात वाघाने रानडुकरांची शिकार केली होती, मात्र तो वाघ नेमका गेला कुठे याचा वन विभागाला थांगपत्ता लागला नाही.आज सकाळी डोंगरगाव येथील हुडकीवर वाघाचे जवळुन दर्शन झाल्याने त्यांचे फगमार्क वरून वनविभाग वाघाचा शोध घेत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI