AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara MPSC | शेतकऱ्याचा पोरगा झाला RTO inspector, भंडाऱ्यातील मायबापाच्या डोळ्यात आले पाणी!

शेतकरी पुत्राने MPSC गाजविली. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यानं यश गाठलंय. भंडारा जिल्ह्यातील लहानश्या नेरी या गावातील जयंत प्रल्हाद कारेमोरे यानं. आई-वडिलांनी शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाचं चीज या पोरानं करून दाखविलं.

Bhandara MPSC | शेतकऱ्याचा पोरगा झाला RTO inspector, भंडाऱ्यातील मायबापाच्या डोळ्यात आले पाणी!
नेरीच्या जयंत कारेमोरे या शेतकरी पुत्राने एमपीएससीत यश मिळवले. आपल्या आई-वडिलांसोबत जयंत.Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 27, 2022 | 2:12 PM
Share

तेजस मोहतुरे

भंडारा : जिल्ह्यातील नेरी या गावातील जयंत प्रल्हाद कारेमोरे (Jayant Pralhad Karemore) यांनी MPSC मध्ये घवघवित यश मिळवलं. RTO इंस्पेक्टर पदवर त्याला नियुक्त मिळाली. राज्य आयोगाच्या असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर (Assistant Motor Vehicle Inspector Regional Transport Officer) पदाकरिता त्याची निवड झाली. राज्यातील दीड लाख युवकांनी प्रीलिमरी परीक्षा दिली. पाच हजार युवकांची निवड मुख्य परीक्षेकरिता झाली. यात जयंत याने राज्यातून 24 वी रँक मिळविली. तो ओबीसी प्रवर्गातून राज्यातून तिसरा आला. विदर्भातील जयंत हा ओबीसी प्रवर्गातून पहिलाच ( Vidarbha the first from OBC category) विद्यार्थी ठरला आहे. जयंतला आई वडिलांचा मोठा आधार आहे. शिक्षणासाठी शेत व घर विकावे लागले तरी चालेल. पण प्रयत्न सोडायचे नाहीत, असा वडिलांनी धीर दिला. आईने शिक्षणासाठी गटातून पैसे उभे केले होते.

वाचनालयातून आणली पुस्तकं

एवढेच नाही तर स्पर्धा परीक्षा शिकवणीकरिता मोठ्या बहिणीने लाख रुपये दिले. तरीही पैसे अपुरे पडत असल्याने जयंतने घरीच अभ्यास केला. संघर्षमय जीवनातून यश प्राप्त केले. जयंत याने वाचनालयातून पुस्तके आणली. MPSC तयारी सुरू ठेवली. दरम्यान त्याने वेळ वाया जाऊ म्हणून त्याने यूपीएससी दिली. मात्र काही गुणाने यश काही गुणांनी निसटले. पण त्याने धीर सोडला नाही.

माजी सरपंच मलेवार यांचीही मदत

राज्य आयोगाच्या जागाने अर्ज भरला परीक्षा दिली. दुसरीकडं जयंतची परीक्षेच्या कालावधीत नेहमी तब्येत बिघडायची. अशा कठीण प्रसंगी माजी सरपंच आनंद मलेवार नेहमी मदतीला धावून आले. आर्थिक मदतीसह त्याच्या उपचारासाठी मदत केली. संघर्षाच्या काळात अनेक प्रसंग जयंतला भेडसावत. मात्र जयंत काही डगमगला नाही. त्यानं आपला प्रवास सुरू ठेवला. अखेर त्याने ते यश मिळविले आहे.

Video Amravati | येवदा ग्रामसभेत राडा; सामाजिक कार्यकर्त्यास मारहाण, नेमकं कारण काय?

Video | कोरोना काळात मुंबई मनपाला लुटलं, Devendra Fadnavis यांचा शिवसेनेवर घणाघात, 24 महिन्यांत 38 मालमत्ता!

Chandrapur | आझाद बगीच्याच्या उद्घाटनावरून गोंधळ; आमदार जोरगेवार-सुधीर मुनगंटीवार आमनेसामने

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली