AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच… रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट

रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड चर्चा होताच... रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी अपडेट
Minister Bharat GogawaleImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 23, 2026 | 5:39 PM
Share

रायगडच्या पालकमंत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली. यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर आता भरत गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भरत गोगावेंना पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता

गेल्या काही काळापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत रस्सीखेच सुरू आहे. याआधी अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी भरत गोगावलेंकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज मुंबईत भरत गोगावले, सुनील तटकरे आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यात भरत गोगावलेंकडे पालकमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

काय म्हणाले सुनील तटकरे?

रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी म्हटले की, रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय लवकरच संपुष्टात आणू. आजच शिंदे साहेबांशी चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बसून हा विषय सुटेल आणि त्याला अंतिम स्वरूप दिला जाईल. ज्यावेळी माझ्यासारखी व्यक्ती हा विषय संपला असं बोलते त्यावेळी सामुच्चाराने यावर निर्णय होईल. महायुती म्हणून राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना एकत्रित बसून या संदर्भात निर्णय केला जाईल.

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल – शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल. सुनील तटकरे आणि भरत गोगावले या दोघांनी चर्चा केलेली आहे. मीही मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे. त्यामुळे हा तिढा लवकरचं सुटेल. दरम्यान, आता जवळपास सर्वच नेत्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार असं म्हटलं आहे.  त्यामुळे आता रायगडला लवकरच नवा पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना