AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhawesh Kaware : भावेश कावरे प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर नव्या मोहिमेला सुरुवात, नेमकं काय घडलं?

आता भावेश कावरे प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. त्याच्या समर्थनात नव्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

Bhawesh Kaware : भावेश कावरे प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर नव्या मोहिमेला सुरुवात, नेमकं काय घडलं?
bhavesh kawareImage Credit source: TV9
| Updated on: Aug 14, 2026 | 9:53 AM
Share

रिअल इस्टेट एजंट भावेश कावरे सध्या चांगलाच वादात सापडला आहे. भावेश कावरेवर त्याच्या एका व्हिडिओमुळे टीकेची झोड उठली आहे. मासांहार करणाऱ्यांना ताडदेवमध्ये घर मिळणार नसल्याचे त्याने एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. भावेश कावरेच्या या व्हिडिओनंतर ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली. त्याच्या घराच्या पाटीवर मनसेने कोंबडीच्या पायांचा हार घालून आंदोलन केलं. त्यानंतर भावेश कावरेने माफी मागून थेट देवेंद्र फडणवीसांना मदतीची मागणी केली. याच भावेश कावरेच्या समर्थनात नव्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

भावेश कावरेने ताडदेवमध्ये एका प्लॅटच्या विक्रीसाठी व्हिडिओच्या माध्यमातून एका जाहिरात केली होती. त्याने जाहिरातीत मांसाहार करणाऱ्यांना फ्लॅट विक्री करणार नसल्याचे म्हटलं होतं. त्याच्या या विधानाचा जोरदार विरोध झाला. ठाकरे गट आणि मनसेने खळखट्याकचा इशारा दिल्यानंतर भावेश कावरेने माफी मागितली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कावरेच्या घरी जाऊन त्याच्या नेम प्लेटला कोंबडीच्या पायांचा हार घालत आंदोलन देखील केलं होतं.

भावेश कावरे प्रकरणात ट्विस्ट 

मुंबईत अनेक धर्म, जातींचे लोक राहतात. त्यामुळे मांसाहार करण्यावरून फ्लॅट नाकाराणे चुकीचे असल्याची भूमिका मनसे आणि ठाकरे गटाने घेतली होती. मनसेच्या दिनेश पुंडे यांनी भावेश कावरेच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. स्वत: च्या व्हिडिओचं समर्थन करणाऱ्या भावेशने नंतर व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शाकाहारी आणि मांसाहारी गुण्यागोविंदाने राहत होते. त्याकाळी अशी पकडून ठोकण्याची भाषा केली जात नव्हती, असे त्यांने म्हटलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. मनसे, ठाकरे गटाच्या इशाराऱ्यानंतर भावेश कावरेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मदत मागितली होती. आता त्याच्या समर्थनात काही जण धावून आल्याचे समोर आलं आहे. आता त्याच्यासाठी ‘जस्टिस फॉर भावेश कावरे’ या मोहिमेला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात जनतेची दिशाभूल करू नका, अशा आशयाची पोस्ट देखील लिहिली आहे.

Follow Us
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले