AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे माफी मागा, अन्यथा शिवाजी पार्कात येऊन…भीम आर्मीचा इशारा; साहिल वाकोडे प्रकरणातील भूमिकेवर आक्षेप!

आम्ही शैक्षणिक ताणाचा मुद्दा नाकारत नाही; मात्र शैक्षणिक ताण आणि जातीय भेदभाव हे स्वतंत्र मुद्दे असून दोन्हींची चौकशी होणे आवश्यक आहे. साहिलच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही समान गांभीर्याने घेतले पाहिजे. साहिल वाकोडे हा महाराष्ट्राच्या मातीतला तरुण होता. त्याच्या मृत्यूचे सत्य तपासातून समोर आले पाहिजे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी भीम आर्मीने केली.

राज ठाकरे माफी मागा, अन्यथा शिवाजी पार्कात येऊन...भीम आर्मीचा इशारा; साहिल वाकोडे प्रकरणातील भूमिकेवर आक्षेप!
raj thackeray and bhim armyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 10:18 PM
Share

Sahil Wakode IIT Pawai : आयआयटी पवईमध्ये शिकत असलेल्या साहिल वाकोडेचे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. साहिल वाकोडने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपले. आमच्या मुलाचा मानसिक छळ चालू होता. त्याला जातीवाचक शिवीगाळ केली जात होती, असा आरोप त्यांच्या पालकांनी केलाय. दुसरीकडे या घटनेचे राजकीय पडसादही उमटत आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. जाती-पातीच्या राजकारणात गुरफटून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. आता त्यांच्या या भूमिकेचा भीम आर्मीने निषेध केलाय.

जातीय छळाच्या गंभीर आरोपांना केवळ…

IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेचा भीम आर्मी महाराष्ट्रतर्फे तीव्र निषेध करण्यात आलाय. राज ठाकरे यांनी शिक्षणव्यवस्थेतील ताण, मानसिक आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले आहे. मात्र, साहिलच्या कुटुंबीयांनी केलेल्या जातीय छळाच्या गंभीर आरोपांना केवळ ‘जातीय राजकारण’ म्हणून बाजूला काढणे योग्य नाही. या आरोपांवर गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी जातीय छळाच्या आरोपांना नाकारण्याऐवजी त्यांची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, असे मत भीम आर्मीने व्यक्त केले आहे.

मृत्यूचे सत्य तपासातून समोर आले पाहिजे

आम्ही शैक्षणिक ताणाचा मुद्दा नाकारत नाही; मात्र शैक्षणिक ताण आणि जातीय भेदभाव हे स्वतंत्र मुद्दे असून दोन्हींची चौकशी होणे आवश्यक आहे. साहिलच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही समान गांभीर्याने घेतले पाहिजे. साहिल वाकोडे हा महाराष्ट्राच्या मातीतला तरुण होता. त्याच्या मृत्यूचे सत्य तपासातून समोर आले पाहिजे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी भीम आर्मीने केली.

राज ठाकरेंनी माफी मागावी

राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करून साहिल वाकोडे यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी आणि दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी भीम आर्मी महाराष्ट्रची मागणी आहे. अन्यथा भीम आर्मी महाराष्ट्रच्या वतीने शिवाजी पार्क येथील मनसे कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीने दिलाय.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी