AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उपोषण मागे घेताच बच्चू कडूंना दणका, झाला मोठा गेम

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं, उपोषणाला स्थगिती देताच आता त्यांना मोठा धक्का बसला आहे, त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

मोठी बातमी! उपोषण मागे घेताच बच्चू कडूंना दणका, झाला मोठा गेम
| Updated on: Jun 16, 2025 | 3:56 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र करण्यात आलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

मला अपात्र केलं त्याची साधी नोटीस देखील दिली नाही, संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू आहे. अधिकाऱ्यांना देखील विचारलं पाहिजे, ज्याला अपात्र केलं त्यांना नोटीस दिली का? अमरावतीत काँग्रेस प्रणित भाजप आहे. भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून या प्रकरणात मला गोवल्या जातं आहे.

अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर लगेचच अशापद्धतीने कारवाई होते, हे बरोबर नाही.  कशा पद्धतीने दबाव तंत्राचा वापर केला जाऊ शकतो, याचं हे उत्तम उदाहारण आहे. या अपात्रतेच्या निर्णयावर आम्ही न्यायालयात जाऊ, न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, विभागीय निबंधक हा एका मंत्र्याचा नातेवाईक आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहे. अशा पद्धतीने कारवाई होणार हे अपेक्षितच होतं, पण आता आमचं आंदोलन थांबणार नाही, अपात्र केल्याची अद्याप नोटीस नाही, नोटीस आल्यानंतर आम्ही न्यायालयात जाऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शेतकरी कर्जमाफी आणि आपल्या इतर काही मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. सातव्या दिवसी त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. उपोषणाचा सहाव्या दिवशी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली होती. बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवांद साधला. कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्यात येईल, तिचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं होतं. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी देखील बच्चू कडू यांची भेट घेतली, अखेर सातव्या दिवशी बच्चू कडू यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप