AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; दोन बडे नेते गळाला, मोठा धक्का

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे दोन बडे नेते लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

मोठी बातमी! अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; दोन बडे नेते गळाला, मोठा धक्का
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 16, 2025 | 5:16 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं तब्बल 232 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे, महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन बडे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 23 मार्च रोजी नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश होणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर आता हा आणखी एक मोठा झटका काँग्रेसला बसणार आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुका लागू  शकतात असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असतानाच दुसरीकडे आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...