
राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, त्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमला राज्यात मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि सोलापूरचे शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. हा राज्यात एमआयएमला मोठा धक्का मानला जात आहे. एमआयएमचे नेते एम्तियाज जलील यांच्या नंतर फारुख शाब्दि हे एमआयएमचे राज्यातील दुसरे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभेतून फारुख शाब्दि यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती, दोन्ही वेळेस फारुख शाब्दि हे दुसऱ्या क्रमांकावर होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एमआयएमसाठी मोठा धक्का मानला जात आहे. फारुख शाब्दि यांच्याकडे सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष आणि प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी होती. मात्र पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत राजकारणमुळे शाब्दि यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा एमआयएमला मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसला धक्का
दरम्यान दुसरीकडे एमआएमने सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर झाली त्यानेच एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. सोलापुरातील प्रभाग 16 च्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे फिरदोस पटेल यांनी एमआयएमचे कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांच्या उपस्थितीमध्ये एमआयएममध्ये प्रवेश केला, आणि त्यानंतर शाब्दि यांनीच राजीनामा दिला आहे. शाब्दि यांच्या राजीनाम्यामुळे एमआयएमला मोठा धक्का बसला आहे.
पक्षांतरला वेग
दरम्यान दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला देखील जोरदार वेग आला आहे. सध्या महायुतीमध्ये वेगवेगळ्या पक्षांमधून पक्षांतर होत आहेत. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून, त्यामुळे निष्ठावंत नाराज असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.