AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना मोठा धक्का, मराठवाड्याच्या राजकारणात नवं ट्विस्ट

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. बीडसह मराठवाडा हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यावेळी त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना मोठा धक्का, मराठवाड्याच्या राजकारणात नवं ट्विस्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2025 | 2:40 PM
Share

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे.  ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. याची सर्वाधिक तीव्रता ही मराठवाड्यात दिसून येत आहे. नुकतीच बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली, त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे, या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे  मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पकंजा मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जय भगवान महासंघाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अशातच जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार आहे. मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे. जो कोणी ओबीसींचा विचार करेल असेच  नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी आता थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना आव्हानच दिले आहे.

या निवडणुकीत मराठा समाज बांधवांना देखील सोबत घेणार असल्याची माहिती बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी जातीवाद संपला पाहिजे, असेही बाळासाहेब सानप यांनी म्हटले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता मराठवाड्यातील किती जागांवर जय भगवान महासंघ आपले उमेदवार उभे करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे जय भगवान महासंघ निवडणूक रिंगणात उतरत असल्यामुळे मराठवाड्यातील ओबीसी नेत्यांना आता हे एक प्रकारे आव्हानच मानलं जात आहे. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी आम्ही निवडणुकीच्या काळात देखील लावून धरणार आहोत, आणि त्याच माध्यमातून आता येणारी निवडणूक आम्ही लढणार आहोत, असं सानप यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...