मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, मित्र पक्षानेच केला करेक्ट कार्यक्रम

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, मित्र पक्षानेच केला करेक्ट कार्यक्रम
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 07, 2025 | 3:16 PM

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. नेत्यांचे एका पक्षामधून दुसऱ्या पक्षात प्रवेश सुरू आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक बड्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा पक्ष प्रवेश झाल्यानं याचा मोठा फयदा काँग्रेसला होण्याची शक्यत आहे.

नेमकं काय म्हणाले बाबाजानी दुर्राणी? 

देशातील राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे तेच चित्र राज्यात आहे, अल्पसंख्यांक समाजातील लोकांना डावललं जाते आहे, असा आरोप यावेळी दुर्राणी यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, बडी देर करदी मेहेरबान आते आते, असं अमित देशमुख यांनी मला म्हटलं.  देशात भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष राहणार आहेत.  काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.  जाती धर्माच्या राजकारणाने माथी भडकवण्याचे काम करत फार काळ सत्तेत राहाता येत नाही.  फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने काम केले पाहिजे, प्रांतअध्यक्षांना आश्वासन देतो, परभणी जिल्ह्यात आम्ही पक्षाला एक नंबर करू, राज्यभरातील परिस्थिती अशी आहे की समाजातील एकोपा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसमध्ये काम करावे लागेल, असं दुर्राणी यांनी म्हटलं आहे.

अमित देशमुख काय म्हणाले?

दुर्राणी हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार याची चर्चा सुरू होती,  मराठवाड्याच्या मातीतील नेतृत्व आज आमच्यात सहभागी झाले, अनेकदा मी त्यांना प्रस्ताव दिला होता, पण आज वेळ जुळून आली, देर आये दुरुस्त आये . हर्षवर्धन सपकाळ यांनी जनमताला महत्त्व दिले, पक्षाचे बळ वाढते आहे. जब आप हमे आवाज देंगे, तबतब हमे साथ पाऐंगे, असं यावेळी अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.