
उद्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे, शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांनी शिवसेना ठकरे गटाच्या उपनेतेपदाचा देखील राजीनामा दिला आहे. ते उद्या दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
मिरा भाईंदरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत, मात्र त्यापूर्वीच या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो आणि माजी नगरसेवक जार्जी गोविंद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर धक्क्यावर धक्के
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली होती, महायुतीचा मोठा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीनं राज्यात तब्बल 232 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली. त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते हे आता शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राजन साळवींचा पक्ष प्रवेश
दरम्यान उद्या शिवसेना ठाकरे गटाचे आणखी एक बडे नेते राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी तीन वाजता ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.