मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यानं साथ सोडली, राष्ट्रवादीत होणार मोठा पक्षप्रवेश

महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला असून, मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यानं साथ सोडली, राष्ट्रवादीत होणार मोठा पक्षप्रवेश
उद्धव ठाकरे यांना धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 26, 2025 | 2:54 PM

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका पार पडल्या, या निवडणुकींमध्ये महायुतीमध्ये विशेष: भाजपात जोरदार इनकमिंग झाल्याचं पाहायला मिळालं, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तर भाजपमध्ये प्रवेश केलाच, परंतु सोबतच भाजपने आपलाच मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला देखील मोठा धक्का दिला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला वेग आला आहे, अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं होतं, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून अनेकांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात अनेकांनी प्रवेश केला, याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला.  दरम्यान अजूनही शिवसेना ठाकरे गटातून इतर पक्षात प्रक्षप्रवेश सुरूच आहेत. आता पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख सुरज लोखंडे हे आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. सुरज लोखंडे हे आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, याचसोबत इतरही अनेक शिवसैनिकांचा सुद्ध पक्ष प्रवेश होणार आहे. कालच माजी नगरसेवक अशोक हरणावळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला, त्यानंतर आता हा शिवसेना ठाकरे गटासाठी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युती करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर दोन दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली, मात्र त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्येच मनसेला दोन मोठे धक्के बसले आहेत, तर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरज लोखंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.