AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंना लागली लॉटरी; 20 नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश

Shinde vs Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. तब्बल 20 नगरसेवकांसह अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंना लागली लॉटरी; 20 नगरसेवकांसह अनेकांचा पक्षप्रवेश
Shivsena ubt 20 corporator join Shiv senaImage Credit source: Google
| Updated on: Jun 09, 2026 | 10:27 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अनेक नेते आपापल्या सोयीनुसार पक्षांतर करत असल्याचे समोर आले आहे. याचा सर्वात मोठा फटका हा महाविकास आघाडीतील पक्षांना बसला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. तब्बल 20 नगरसेवकांसह अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार

आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. वरळी गावातील ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच आज रायगडच्या कर्जतमधील ठाकरे गटाच्या 20 नगरसेवकांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी बोलताना सूर्यकांत कोळी यांनी म्हटले की, वरळी कोळीवाड्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मी 40 वर्षे पक्षाचं काम केलं पण मला उमेदवारी दिली नाही. मी वरळी गावांतील प्रश्न सोडवण्यासाठी पक्षप्रवेश केलेला आहे.

एकनाथ शिंदेंकडून पदाधिकाऱ्यांचे स्वागत

या पक्षप्रवेशानंतर बोलताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सर्व ठिकाणाहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. काही नसताना देखील ज्या विश्वासानं ते शिवसेनेतं येत आहेत, सगळ्यांना चालना देण्याचं काम मी करेन. पुन्हा एकदा आपलं मी स्वागत करत आहे. पंतप्रधान मोदी 12 वर्षे सातत्यानं काम करत आहेत. देशाला यशस्वीपणे पुढे नेण्याचं काम आपल्या नरेंद्र मोदींनी केलेलं आहे.

वेगाने विकास होत आहे

पुढे बोलताना शिंदे यांनी म्हटले की, शिवसेना एनडीएचा प्रमुख घटकपक्ष म्हणून आपण काम करत आहोत. मोदीसाहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मोदी साहेबांनी देशाला शिखरावर पोहोचवण्याचं काम केल आहे. विकास सध्या वेगांने होत असल्याचं पहायला मिळतं आहे. तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप