AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप, हा नेता शेकडो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असून, आता आणखी एक नेता आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहे.

मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप, हा नेता शेकडो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 6:37 PM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला होता, महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, तर महाविकास आघाडीनं या निवडणुकीत मोठं यश मिळवलं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना हे यश टिकवता आला नाही, राज्यात पुन्हा एकदा महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागा मिळाल्या तर दुसरीकडे महायुतीचा मोठा विजय झाला, राज्यात तब्बल 232 उमेदवार विजयी झाले, आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला.

दरम्यान या निवडणुकीनंतर भाजप आणि महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.  शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवेसना शिंदे गटात प्रवेश केल्याचं पहायला मिळत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपात प्रवेश केला आहे.

मात्र आता जो धक्का बसला आहे तो शेतकरी कामगार पक्षाला बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख आणि  सध्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले व  शेकापचे नेते बाळासाहेब एरंडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब एरंडे यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीमध्ये त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांसह बाळासाहेब एरंडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, येत्या दहा ऑक्टोबर रोजी हा पक्ष प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यापूर्वी हा शेकपसाठी मोठा धक्का मानला जात आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...