शेतकऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज, कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित, कर्जखात्यावर थेट रक्कम जमा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर राज्य सरकारच्या वतीने कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात हस्तांतर केली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, अखेर राज्य सरकारच्या वतीने कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 5029 कोटी रुपये ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात हस्तांतर केली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान त्यानंतर आता राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळणार आहे. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
फडणवीस यांची प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, मला अतिशय आनंद आहे की आपण अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी घोषित केली होती. त्या अंतर्गत पहिली यादी घोषित केली होती. घोषित केलेली यादी सर्व ग्रामपंचायतींना पाठवली. साध्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आधार ऑथेंटिकेशन करायचे. अर्ज नाही. बाकी काही नाही. त्यांची खाती निल करायची अशा प्रकारचं काम हाती घेतलं होतं. आज जवळपास ५ हजार २९ कोटी रुपये ६ लाख २०२२ शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ गेला आहे. ही खाती निल झाली आहेत.
एमपीएवर लावलेलं व्याज होतं. त्यामुळे कर्ज अधिक दिसत होतं. बँकांनी ते व्याज रद्द केल्याने अकाऊंटमधील पैसे आणि शासनाने भरलेले पैसे सारखे असल्याने ही अकाऊंट निल झाली आहे. आता रोज मोठ्या प्रमाणात अकाऊंट येतील. जसे जसे अकाऊंट येतील त्या खात्यात पैसे जातील. १२ लाख अकाऊंट बँकांना परत पाठवले. बँकांनी चुका केल्या. आठवड्या भरात तेही सुधारून परत करणार आहे. हे अकाऊंट क्लिअर होऊन त्यात पैसे टाकले जाणार आहे.
