सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्ब्येत खालवली आहे. त्यांना लवकरच गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर जरांगेची प्रकृती खालावली आहे.

सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली
Jarane Patil Health Down
Image Credit source: Google
| Updated on: Aug 14, 2026 | 10:58 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालवली आहे. त्यांना लवकरच गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर जरांगेचा प्रकृती खालावली आहे. या दौऱ्यात जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा घेतल्या होत्या. या दगदगीमुळे जरांगे पाटलांची तब्येत कमकुवत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जरांगे पाटलांची तब्येत खालावली

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांनी या दौऱ्यात अनेक सभा घेतल्या, तसेच अनेक ठिकाणी असलेल्या बैठकांना हजेरी लावत मराठा समाजातील लोकांना मार्गदर्शन केले. जरांगे पाटलांनी रात्री-अपरात्री अनेक सभा घेतल्या. तसेच त्यांना शेकडो किमीचा प्रवासही करावा लागला. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.

जरांगे पाटलांची बावनकुळेंवर टीका

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात मनोज जरांगे पाटलांनी भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. जरांगे पाटील यांनी मराठ्यांचे जात प्रमाणपत्र अवैद्य ठरवण्याचे आदेश बीडमध्ये बावनकुळेंनी दिल्याचा दावा केला होती. तसेच जरांगे यांनी थेट बाहुबली सिनेमातील संवाद भरसभेत बोलून दाखवला होता. आआथातू अरअरअर… अरअरअर पा पा पा पपप पा तिरर्रे… अशी डायलॉगबाजी मनोज जरांगे यांनी केली होती. तसेच बावनकुळे यांच्यावर व्यंगात्मक टीकाही केली होती.

यापुढे व्यंगात्मक टीका करणार नाही – जरांगे पाटील

जरांगे पाटलांनी बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका केली होती. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, मराठा समाजाच्या आड कुणीही आला तरी त्याला गुडघे टेकायला लावतो. मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणूंन तुम्ही रडकुंडीला आलात, तुम्ही परळीच्या टोळीच्या नादेला लागलात म्हणून तुमच्यावर ही वेळ आली आहे. तुम्ही त्यांचं ऐकून मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं. एकवेळ तुम्हाला माफ करतो, यापुढे तुमचं व्यंग करणार नही, पण परळीची टोळी तुमच्याजवळ दिसली नाही पाहिजे. 28 ऑगस्टच्या आत तुम्ही पत्र दिलेली चूक दुरुस्त करून द्या, रद्द केलेले प्रमाणपत्र वैध करून द्या. एक वेळ तुम्हाला माफ करतो पण परळीची टोळी तुमच्या जवळ दिसायला नको, यापुढे तुमचं व्यंग करणार नाही.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us