AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी, बारामतीची निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाच 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे

बारामती विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. 35 जणांनी राजीनामे दिले आहेत.

मोठी बातमी! राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी, बारामतीची निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाच 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे
ncpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 7:29 PM
Share

अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, अजित पवार यांच्या अपघातानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. दरम्यान त्यानंतर आता या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसकडून देखील या मतदारसंघात आपला उमेदवार देण्यात आला होता. काँग्रेसने या मतदारसंघात आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती.

मात्र महायुतीच्या प्रयत्नांना यश आलं उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान यामुळे महायुतीला मोठा दिलासा मिळाला, तरी देखील ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये, अनेक अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. दरम्यान या निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असातना राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.

सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून गट नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावरून वातावरण चांगलंच तापलं असून,  शहर राष्ट्रवादीच्या 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.   राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सोपवले आहेत. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत गटनेते मैनूद्दीन बागवानांकडून पक्षाचा आदेश डावला गेल्याचा आरोप या नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे.  त्यांनंतर सांगली राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असून, तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. दुसरीकडे शहर जिल्हाध्यक्ष  पदमाकर जगदाळे यांनी देखील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी देखील गटनेते बागवान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...