AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्ट्रातल्या या बड्या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, ठेविदारांमध्ये चिंता, तुमचंही अकाउंट आहे का?

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात यापूर्वी देखील काही बँकेत घोटळा झाल्याची प्रकरणं समोर आली होती, त्यांच्यावर आरबीआयने कारवाई देखील केली आहे. दरम्यान आता आणखी एका बड्या बँकेत मोठा घटाळा झाला आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रातल्या या बड्या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, ठेविदारांमध्ये चिंता, तुमचंही अकाउंट आहे का?
bank Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 2:49 PM
Share

राज्यात यापूर्वे देखील काही बँकांमध्ये घोटाळा झाल्याची प्रकरणं घडली आहे. या बँकांवर आरबीआयकडून कारवाई देखील करण्यात आली. बँकेत घोटाळा झाल्यास ठेवीदारांची चिंता वाढते, काही प्रकरणात तर आरबीआयने कारवाई केल्यामुळे अनेक ठेवीदारांना आपल्याच हक्काचे पैसे मिळण्यासाठी देखील अनेक महिने वाट पहावी लागते. यामुळे ठेवीदारांची मोठी गौरसोय होते. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये काही बँका आणि पतसंस्थांमध्ये मोठे घोटाळे झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  दरम्यान त्यानंतर आता आशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना समोर येताच ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जालन्याच्या बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत 7.31 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने ठेवून 7 कोटी 31 लाख रुपयांची बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.  या प्रकरणात बदनापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यापैकी बँक मॅनेजर आणि सुवर्णकाराला ताब्यात घेण्यात आलं आहे, तर आणखी एक जण फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळा प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील बदनापूर शहरात देखील कॅनरा बँकेत 7 कोटी 31 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात बँक मॅनेजर सुवर्णकार आणि इतर एक अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बदनापूर पोलिसांनी बँक मॅनेजर आणि सुवर्णकाराला अटक केली असून एक जण फरार आहे.

कॅनरा बँकच्या या शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने ठेवून बँकेची 7 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे, बँकेच्या धोरणानुसार सुरू असलेल्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला आहे. सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे याने बनावट सोन्याला खरे सोने असल्याचे प्रमाणित करून बँकेची फसवणूक करण्यात साथ दिली असल्याचंही समोर आलं आहे.  दरम्यान या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात येत असून, यामध्ये अजून काही जण सामील असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ