AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगेंना हाय कोर्टाचा सर्वात मोठा झटका, मुंबईतील आंदोनासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर याविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर सुनावणी पार पडली, सुनावणीवेळी हाय कोर्टाकडून महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगेंना हाय कोर्टाचा सर्वात मोठा झटका, मुंबईतील आंदोनासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय
manoj jarange Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 4:39 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्या मराठा बांधवांची राज्यव्यापी बैठक अंतरवाली सराटीमध्ये बोलावण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर याविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर सुनावणी पार पडली, सुनावणीवेळी हाय कोर्टाकडून महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांना परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असं हाय कोर्टाने म्हटलं आहे. आधी परवानगी घ्या आणि मग मुंबईत येऊन आंदोलन करा असं हाय कोर्टाने या सुनावणीवेळी म्हटलं आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येची तपासणी करण्याच्या सूचना देखील यावेळी हाय कोर्टाकडून करण्यात आल्या आहेत.

हाय कोर्टाने नेमकं काय म्हटलं? 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. त्यांच्याकडून आता मुंबईत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची राज्यव्यापी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आंदोलनाच्या तारखेची घोषणा करणार आहेत. परंतु त्यापूर्वीच या आंदोलनाविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा या याचिकेत करण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी वेळी कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नसल्याचं हाय कोर्टाने म्हटलं आहे, आधी परवानगी घ्या अन् नंतर मुंबईत आंदोलन करा असंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतेची तपासणी करा, गरज पडल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करा अशा सूचनाही न्यायालयाने यावेळी दिल्या आहेत. दरम्यान उद्या मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. जरांगे पाटील हे मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळे जरांगे पाटील यांची पुढची रणनिती काय असणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर..
गणेशोत्सवाआधीच तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; तब्बल 4 कंटेनर भरुन...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता