AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठं ट्विस्ट, तळहातावरील अक्षर कोणाचं? खळबळजनक माहिती समोर

फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवलं, या घटनेनं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे, दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली असून, प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठं ट्विस्ट, तळहातावरील अक्षर कोणाचं? खळबळजनक माहिती समोर
crime Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 19, 2025 | 11:45 AM
Share

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, या डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे.  दरम्यान मृत्यूपूर्वी या डॉक्टरने आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिली होती, त्या सुसाईड नोटमध्ये तिने पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोपाळ बदने याने आपल्यावर अत्याचार केल्याचं या डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, तर प्रशांत बनकर हा आपला शारीरीक आणि मानसिक छळ करत होता असाही आरोप या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.  आता या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत, तसेच नवी माहिती देखील समोर आली आली आहे.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?  

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे. कुटुंबातला एकही व्यक्ती मानायला तयार नाही की या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे म्हणून, घरच्यांना असं वाटत आहे की ही आत्महत्या घडवून आणली गेली आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. या घटनेसंदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे, या प्रकरणात एसआयटी नेमावी, आणि या एसआयटीमध्ये सिनियर महिला आयपीएस अधिकारी नियुक्त कराव्यात असंही यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, मृत महिला डॉक्टरच्या बहिणीचं म्हणणं आहे की, हे हस्ताक्षर तिचं नाहीच आहे. त्यामुळे पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, सर्वांचे सीडीआर काढले पाहिजेत, सरळ-सरळ खासदारांच्या दोन पीएंचा यामध्ये संबंध जोडला गेला, आहे असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेल्या प्रशांत बनकर याला पोलिसांनी आधीच अटक केली होती, तर दुसरा आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने हा देखील पोलीस ठाण्यात हजर झाला, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...