मोठी बातमी! ठाकरे गटाच्या बंडखोर खासदार प्रकरणात मोठा ट्विस्ट; अजूनही डाव उद्धव ठाकरेंच्याच हातात? गेम पलटणार
शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे, शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत, तसेच ते स्वतंत्र गट करण्याच्या तयारीमध्ये देखील असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी सहा खासदार फुटले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या आठवड्यात रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांची बैठकी बोलावली होती, तेव्हाच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. कारण या बैठकीला प्रत्यक्षात शिवसेना ठाकरे गटाचे केवळ चारच खासदार उपस्थित होते, तर 5 खासदार हे व्हिसीद्वारे उपस्थित होते, असा दावा, त्यावेळी संजय राऊत यांनी केला होता, तसेच सर्व खासदार हे आमच्यासोबतच असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
मात्र आता जवळपास चित्र स्पष्ट होताना दिसत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याची माहिती समोर येत आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या सहा खासदारांकडून नवा गट स्थापन करण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील, वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे सहा खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे तीन खासदार अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत.
मात्र आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याची बातमी आहे, ज्यामध्ये खासदार संजय देशमुख यांचा देखील समावेश आहे. मात्र त्यांनी आता मोठं विधान केलं आहे. संजय देशमुख यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. असं अजून काहीही घडलेलं नाहीये, आम्ही कोणाकडेही गेलेलो नाही, असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी केलं आहे. तर दुसरीकडे असंच विधान संजय दिना पाटील यांनी देखील केलं आहे , दरम्यान यामुळे आता पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता मातोश्रीवर देखील घडामोडींना वेग आला असून, या संदर्भात आता गुरुवारी सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.