AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपाची विधानपरिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी, धक्कातंत्राचा वापर

भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी राज्यातील बऱ्याच बड्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या. परंतु भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

मोठी बातमी! भाजपाची विधानपरिषद निवडणुकीसाठी यादी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी, धक्कातंत्राचा वापर
vidhan parishad electionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 28, 2026 | 9:32 PM
Share

Vidhan Parishad Election 2026 BJP Candidate Election : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधानपरिषदेत जावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर शिंदे गटाकडून प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यासाठी चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता भाजपाने या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादा जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे यावेळीदेखील भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत पक्षात बऱ्याच वर्षांपासून काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

भाजपाने कोणाला उमेदवारी दिली?

भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी राज्यातील बऱ्याच बड्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या. परंतु भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपाने यावेळी माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता सातव यांनादेखील विधानपरिषदेचे तिकीट देण्यात आले आहे.

विवेक कोल्हे यांनाही तिकीट

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात काम करणाऱ्या चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. यात विवेक कोल्हे यांच्या रुपात फक्त एक नाव नवे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्नेहलता कोल्हे यांना पक्षश्रेष्ठीने विश्वासात घेतलं होतं. तुमचा पुढील काळात योग्य तो सन्मान केला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. विवेक कोल्हे हे स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहेत. त्यांना आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे.

पक्षात काम करणाऱ्यांना संंधी

प्रमोद जठार हे कोकणाच्या राजकारणातील प्रमुख नावांपैकी एक आहे. ठाण्यामधून माधवी नाईक यांनाही संधी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या भाजपाच्या महामंत्री म्हणून पक्षाचे काम केलेले आहे. महिलांचे प्रतिनिधीत्त्व म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली आहे. संजय भेंडे यांनीही पक्षासाठी काम केलेले आहे. सुनील कर्जतकर यांच्याकडे आरएसएस म्हणजेच संघाचा एक चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांनाही भाजपाने यावेळी संधी दिली आहे.

भाजपाच्या यादीचे वैशिष्ट्य काय?

विधानपरिषदेसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विभागीय समतोल साधण्यात आल्याचे दिसून येत आहे. सुनील कर्जतकर यांच्या रूपाने मराठवाडा, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपाने कोकण, सुनील भेंडे यांच्या रूपाने विदर्भ तर विवेक कोल्हे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला भाजपने प्रतिनिधित्व दिल्याचं यातून स्पष्ट होते. परंतु विभागीय संतुलनामध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र नंबर लागू शकलेला नाही.

निवृत्त आमदारांचा पत्ता कट

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. यामध्ये कार्यकाळ संपत असलेल्या सर्व चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी नाकारत संघटनेतील महत्वाच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे म्हटले जात आहे. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजित सिंह मोहिते पाटील हे आमदार निवृत्त होत आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच