AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून पक्षातील या नेत्याच्या मुलाला संधी मिळणार का?

Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार पक्षाने उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील, तर आमचा पाठिंबा असेल असं आधीच जाहीर केलं आहे. विधान परिषदेची ही जागा मविआमध्ये ठाकरे गटाकडे जाईल.

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून पक्षातील या नेत्याच्या मुलाला संधी मिळणार का?
Eknath Shinde
| Updated on: Apr 23, 2026 | 4:50 PM
Share

येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. विधान परिषदेवर एक उमेदवार निवडून आणण्यासाठी 28 मतं आवश्यक आहेत. पक्षीय बलाबल लक्षात घेता विधानसभेत भाजपकडे 131 आमदार आहेत. शिवसेनेचे 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 40 आमदार आहेत. आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपचे 5, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार निवडून येऊ शकतो. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या 8 उमेदवारांचा विजय निश्चित आहे. महाविकास आघाडी काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना असे तीन पक्षांचे मिळून 46 आमदार आहेत. म्हणजे मविआचा फक्त एक आमदार विधान परिषदेवर जाऊ शकतो.

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार पक्षाने उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील, तर आमचा पाठिंबा असेल असं आधीच जाहीर केलं आहे. विधान परिषदेची ही जागा मविआमध्ये ठाकरे गटाकडे जाईल. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा स्वत: विधान परिषदेवर जाणार की, दुसऱ्या कोणाला संधी देणार हे लवकरच समजेल.

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेसाठी कोणाच्या नावाची चर्चा?

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही विधान परिषदेवर उमेदवार पाठवले जातात. मागच्या अडीच वर्षांपासून 17 जागा रिक्त होत्या. आता जळगावातून विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुकांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. भाजपकडून नंदूकुमार अडवाणी, नंदकिशोर महाजन, अमोल शिंदे यांची नावं चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्ही पक्ष विधानपरिषदेच्या जागेवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती.दोन्ही पक्षांत एकच उमेदवार देण्यावर एकमत झाले, तर ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाईल अशी माहिती आहे.भाजप आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास आणि दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार कायम ठेवल्यास जिल्ह्यात ‘मैत्रीपूर्ण’ पण थेट लढत होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच