AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur North By Election 2022 : सलग तीन फेऱ्या भाजपच्या नावावर, मविआच्या जयश्री जाधवांना विजय खडतर होणार?

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्या सहा ते सात राऊंडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेऊन विजयाच्या दिशेने कूच केलेली आहे.

Kolhapur North By Election 2022 : सलग तीन फेऱ्या भाजपच्या नावावर, मविआच्या जयश्री जाधवांना विजय खडतर होणार?
सलग तीन फेऱ्या भाजपच्या नावावर, मविआच्या जयश्री जाधवांना विजय खडतर होणार? Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 11:09 AM
Share

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची (Kolhapur North Election Result) चुरस अधिकच वाढली आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्या सहा ते सात राऊंडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (jayshree jadhav) यांनी आघाडी घेऊन विजयाच्या दिशेने कूच केलेली आहे. मात्र, सातव्या फेरीनंतर हे चित्रं पालटताना दिसलं आहे. 8, 9 आणि 10 व्या फेरीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम (satyajeet kadam) यांनी आघाडी घेतली आहे. या फेरीतील उच्चभ्रू मतदारसंघातून कदम यांना आघाडी मिळाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कदम ही आघाडी कायम ठेवण्यात यशस्वी ठरतात का? कदम यांनी आघाडी अचानक आघाडी घेण्यास सुरुवात केल्याने जयश्री जाधव यांना विजय खडतर होणार का? असा सवाल निर्माण झाला आहे. मात्र, हा निकाल पाहण्यासाठी मतदान केंद्रावर तोबा गर्दी झाली आहे. कदम आणि जाधव समर्थकांनी मतदारसंघाबाहेर मोठी गर्दी केली असून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे.

आज सकाळीच 8 वाजता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाची मोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासूनच जयश्री जाधव यांनी मतांची आघाडी घेतली. सात फेऱ्यांपर्यंत त्यांची आघाडी कायम होती. मधल्या एका फेरीत कदम यांनी 500 मतांची आघाडी घेतली होती. मात्र, तरीही जाधव यांचं एकूण मतांचं लीड सात हजाराच्यावर होतं. त्यानंतरच्या फेरीत त्यांनी पुन्हा आघाडी घेऊन कदम यांच्यावर कुरघोडी केली. मात्र, 8, 9 आणि 10 व्या फेरीत सत्यजित कदम यांनी आघाडी घेतली आहे. कदम यांना फार मोठी आघाडी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना जाधव यांचं मतांचं एकूण लीड तोडता आलेलं नाही.

सलग तीन फेऱ्यात आघाडी

कदम यांनी आठव्या फेरीत 524, नवव्या फेरीत 193 आणि दहाव्या फेरीत 926 मतांची आघाडी घेतली आहे. म्हणजे या दोन्ही फेऱ्यात कदम यांनी जवळपास 1600 मतांची आघाडी घेतली आहे. पुढच्या फेरीतही कदम यांची ही आघाडी कायम राहिल्यास जाधव यांना विजयाचा मार्ग खडतर होऊ शकतो. पुढील फेरीतील पेट्या कोणत्या मतदारसंघातील फुटतात यावरही बरंचसं अवलंबून आहे. या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत होती. तर काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादीची साथ होती. त्यामुळे आघाडीचं या ठिकाणी पारडं जड असल्याचं दिसत आहे.

कोणत्या फेरीत कितीची लीड

फेरी- 8

जयश्री जाधव : 2981

सत्यजित कदम : 3505

फेरी लीड : 524 (भाजप लीड)

एकूण लीड : 9152 (काँग्रेस आघाडी)

फेरी- 9

जयश्री जाधव : 2744

सत्यजित कदम : 2937

फेरी लीड : 193 (भाजप लीड)

एकूण लीड : 8959 (काँग्रेस आघाडी)

फेरी-10

जयश्री जाधव : 2868

सत्यजित कदम : 3794

फेरी लीड : 926 ( भाजप लीड)

एकूण लीड : 8073 (काँग्रेस आघाडी)

संबंधित बातम्या:

Kolhapur by Election Result 2022: कोल्हापूरच्या उत्तरच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचं पारडं जड, जयश्री जाधव यांची दोन हजार मतांची आघाडी

Kolhapur उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल आज? कोण मारणार बाजी

Kolhapur Election Result 2022 : काही तासात निकाल हाती, उत्तर कोल्हापुरात “पंजा कसणार की कमळ” फुलणार?

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.