AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा, पण पवार कुटुंबातील दोन व्यक्तींचा विरोध

NCP Merger Talk : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. काहीतरी मोठं घडणार असल्याचे हे संकेत आहेत. गुरुवारी संध्याकाळी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या पक्षाचे जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी होते.

NCP Merger Talk : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं ही भाजपची इच्छा, पण पवार कुटुंबातील दोन व्यक्तींचा विरोध
NCP Merger Talk
| Updated on: Jul 18, 2026 | 9:10 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाल्याच दोन्ही बाजूच्या नेत्यांनी मान्य केलय. पण अजितदादांच्या निधनानंतर ही चर्चा मागे पडली. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत येऊ शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जातय. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अजून बळकट व्हावी असं भाजपचं मत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं अशीच भाजपची सुद्धा इच्छा आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. सध्या अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्र पवार यांच्याकडे आहे. तो भाजपप्रणीत एनडीए सोबत आहे. दुसरा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीमध्ये आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं अशी दोन्ही बाजूच्या अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण एनसीपीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि त्यांचा मोठा मुलगा पार्थ पवार यांना विलिनीकरण नकोय. सुनेत्रा पवार यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. “सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विलिनीकरणाला विरोध आहे. विलिनीकरण झाल्यास शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाचं नियंत्रण जाईल म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विलिनीकरणाला विरोध आहे” असं सुनेत्रा पवार यांच्या जवळच्या सहकाऱ्याने सांगितलं. पार्थ पवार हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत.

राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत

गुरुवारी संध्याकाळी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या पक्षाचे जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी होते. त्यावेळी तिथे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते. त्यानंतर गुरुवारी रात्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी सुरु असल्याचे हे सर्व संकेत आहेत.

वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली, त्या बद्दल जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. जयंत पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. माझी तिथे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत भेट झाली नाही असं त्यांनी सांगितलं.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ