AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya | कथित अश्लील Viral Video वर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया

Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांचा एक कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटीझन्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

Kirit Somaiya | कथित अश्लील Viral Video वर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 18, 2023 | 9:47 AM
Share

मुंबई : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या राजकीय दृष्टया चांगलेच अडचणीत आले आहेत. आरोपांची राळ उडवून देण्यासाठी किरीट सोमय्या ओखळले जातात. भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांवर आतापर्यंत त्यांनी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. ईडी, सीबीआयकडे त्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अनेक नेते राजकीय दृष्टया अडचणीत आले. किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचारा विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका मांडली आहे.

तेच किरीट सोमय्या आता अडचणीत सापडले आहेत. त्यांचा एक कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर नेटीझन्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

कथित अश्लील व्हिडिओवर किरीट सोमय्या काय म्हणाले?

किरीट सोमय्या यांचा हा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. सध्या याच व्हिडिओची चर्चा आहे. या कथित अश्लील व्हिडिओवर आता किरीट सोमय्या यांची बाजू समोर आली आहे. किरिट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. “मी कोणत्याही महिलेचं शोषण केलेलं नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत किंवा ज्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या जातायेत. त्याची सत्यता पडताळून चौकशी करण्यात यावी” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाचे अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “किरीट सोमय्या यांच्याबाबत माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आपण हा विषय योग्य व्यासपीठावर मांडणार आहोत. माझ्यासाठी तक्रार करणाऱ्या महिलांची सुरक्षा महत्वाची आहे” असं अंबादास दानवे म्हणाले. अंबादास दानवे ठाकरे गटाचे आमदार आहेत.

Follow Us
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी