मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल
Narayan Rane
| Updated on: Sep 03, 2025 | 11:02 PM

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या तातडीने शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणेंवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार हे अद्याप समोर आलेलं नाही.

नारायण राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते काही काळ राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. आधी ते कट्टर शिवसैनिक होते, त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कालांतराने ते भाजपमध्ये सामील झाले. ते काही काळ केंद्रिय मंत्रीही होते. त्याची दोन्ही मुले नितेश आणि निलेश राणे हे आमदार आहेत. नितेश राणे हे राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत.

नारायण राणे हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक आहेत. ते नेहमी शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. नारायण राणे हे आपल्या फटकळ भाषेसाठीही ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदासह विविध पदे भूषविली आहेत. मात्र आता त्यांना शस्त्रक्रियेसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.