शरद पवार यांना भाजपच्या बड्या नेत्याची विनंती की, तु्म्ही…
"पतसंस्थेमध्ये ज्यांनी, ज्यांनी व्यवहार केले असतील त्यांची चौकशी होणारच आहे. ज्याने गैरव्यवहार केले असतील, त्यांच्यावर कारवाई होणार. कारण प्रकरण गंभीर आहे. यात कोणाचीही सुटका नाही"

“धरणाभोवताली ज्या जागा आहेत, त्या जर आपण विकसित करू शकलो तर तेथे पर्यटन सुरू करता येईल. तेथील अतिक्रमणं थांबतील. उत्पन्नाचा नवीन स्त्रोत उपलब्ध होईल आणि त्या भागातील लोकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून त्याच्या जाहिराती प्रकाशित केल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडेचा देखील समावेश आहे” अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
“भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. ED ने देखील चौकशीला आता सुरूवात केली आहे. हे मी वर्तमानपत्रात वाचलय. गरिबांचे शोषण, महिलांचे लैंगिक शोषण केले. चमत्कार दाखवू शकतो म्हणून कोटयवधी रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे. ED देखील आहे. SIT मार्फतही चौकशी सुरू आहे. शिर्डीत गुन्हयाचा तपास देखील इकडे सुरू आहे. त्याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ते देखील चौकशी करतील” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
ठाकरे गटाने अर्ज भरलाय
“राहुरी विधानसभेसाठी ठाकरे गटाने अर्ज भरलाय. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने देखील अर्ज भरलाय. काही अपक्ष अर्ज भरलेत. त्यांना विनंती केलीय. बारामती मतदारसंघातय देखील काँग्रेस उभी राहत असेल आणि माघार घेतली. कारण अजित दादांच्या निधनानंतरच तो प्रश्न तयार झालाय.राहुरी मध्ये देखील शिवाजी कर्डीलेंच्या निधनानंतर देखील तो प्रश्न तयार झाला. तेथे देखील राष्ट्रीय पक्षाने तशीच भूमिका घ्यावी” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
शरद पवार यांना देखील माझी विनंती आहे की..
“शरद पवार यांना देखील माझी विनंती आहे की, जी भूमिका बारामती मतदारसंघात घेतली तीच भूमिका राहूरी मतदारसंघात घ्या. म्हणजे निवडणुकीला चांगल स्वरूप येईल. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्या भूमिकेतूनच निवडणुकीतून माघार घेतली” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
पार्थ पवार यांना विखे पाटील यांनी काय सल्ला दिला?
काँग्रेसचा डाऊन फॉल सुरु आहे या पार्थ पवारांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “अशा विधानानंवर आवर घातला पाहिजे. ज्यावेळी आपण निवडणुकींना सामोरे जातो, त्यावेळी प्रत्येक राष्ट्रीय पक्षाची एक वेगळी भूमिका असते. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपली भावना असली तर इतर पक्षांच्या भूमिकेचा सन्मान केला पाहिजे”