Navneet Rana : मौलाना म्हणतो त्याला चार बायका 19 मुलं आहेत, तर मग आपण हिंदुंनी…नवनीत राणा यांचं वक्तव्य
Navneet Rana : "शरद पवार हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. अजित दादा शरद पवार हा त्यांचा परिवार आहे. अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला बीजेपी सोबत जायला शरद पवार यांनी सांगितलं होतं"

“एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि 19 मुलं आहेत. तो म्हणतो की मला तीस-पस्तीस मुलं पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्या पणे चार बायका 19 मुलं पाहिजे असं म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन चार-चार मुलं जन्माला घातली पाहिजेत” असं नवनीत राणा म्हणाल्या. मौलाना सय्यद कादरी यांनी मला 4 बायका आहेत व 19 मुल आहेत असं सांगितलं, यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली.
“मी सगळ्या हिंदू लोकांना सांगते की जर ते खुलेपणे सांगत असतील की 4 बायका आणि 19 मुलं आहेत तर आपण किमान तीन-तीन चार-चार मुलं जन्माला घातली पाहिजेत. त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तानला बनवायचा आहे. ते मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहेत, तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो? आपणही तीन ते चार मुलं जन्माला घातली पाहिजेत यामध्ये काही दुमत नाही” असं नवनीत राणा म्हणाल्या.
तर कारसेवक तिथे जातील
नुकतच भाजप नेत्या नवनीत राणा यांनी मुर्शिदाबाद येथील मशिदीच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य केलं होतं. “काँग्रेसने आजवर समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या आमदारांनीही तेच करण्याचा प्रयत्न केला” असा आरोप नवनीत राणा यांनी केला. राणा यांच्या मते, ‘जर बाबरच्या नावाने मशीद बांधली गेली, तर कारसेवक तिथे जातील, कारसेवा करतील आणि ती तोडण्याचे काम करतील’
त्यामुळे दोन पवार एकत्र होत असतील
“शरद पवार हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. अजित दादा शरद पवार हा त्यांचा परिवार आहे. अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला बीजेपी सोबत जायला शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्यामुळे दोन पवार एकत्र होत असतील, तर चांगलच आहे. दोन ठाकरे एकत्र येत आहेत. त्यांची ती मजबुरी आहे. त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत” असं नवनीत राणा म्हणाल्या.
