AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षकांच्या बदल्यांचा पॅटर्न कसा बदला…पंकजा मुंडे यांनी सांगितला ऑनलाईन बदल्यांची किस्सा

शिक्षकांची पिळवणूक होत होती. १५ वर्षांपासून त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. त्यासाठी त्यांनी पैसा दिल्याशिवाय त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. तो प्रकार माझ्या लक्षात आला. त्यानंतर ऑनलाईन बदलीचा निर्णय मी घेतला. मी कुणाची मिंदी नाही. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे.

शिक्षकांच्या बदल्यांचा पॅटर्न कसा बदला...पंकजा मुंडे यांनी सांगितला ऑनलाईन बदल्यांची किस्सा
पंकजा मुंडे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 10, 2025 | 3:53 PM
Share

गडावर कोणालाही बोलवा. माझी हरकत नाही. गडाच्या विकासासाठी मी सदैव तयार आहे. जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत मी काम करणार आहे. लोकांनी नाही म्हटल्यावर मी घरच्या गादीवर बसले. आपले तत्व आपल्यासाठी आदर्श असतो. मी गुंडांसाठी गुंड, कोणालाही घाबरत नाही, असे राज्याच्या पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

शिक्षकांसाठी ऑनलाईन बदलीचा निर्णय

शिक्षकांची पिळवणूक होत होती. १५ वर्षांपासून काही शिक्षक एकाच ठिकाणी होते. पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात होते. त्यांच्या बदल्या होत नव्हत्या.  बदल्यांसाठी त्यांनी पैसा दिल्याशिवाय त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. तो प्रकार माझ्या लक्षात आला. त्यानंतर ऑनलाईन बदलीचा निर्णय मी घेतला. मी कुणाची मिंदी नाही. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे. जो पर्यंत लोक सांगतील मी काम करणार आहे. जनता जेव्हा नाही म्हणतील तेव्हा मी घरी बसेन, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

ऊस तोड कामगारांचे कष्ट मी करणार आहे. प्रत्येक ऊस तोड कामगारांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करणार आहे. मी जालन्याची पालकमंत्री असली तर माझे लक्ष माझ्या मायभूमीकडे बारीक लक्ष असणार आहे. मी जालन्याची पालकमंत्री असली तरी माझ्या जन्मभूमीकडे माझे लक्ष राहणार आहे. बीडमध्ये अजित दादा पालकमंत्री आहेत. मी मंत्री आहे. दादांना शिस्तीत काम करून दाखवावे लागेल. दादा अर्थमंत्री आहेत.

लाडक्या बहिणींचे प्रेम वाढले

लाडकी बहीण योजना सुरु झाल्यावर माझ्यावर प्रेम करणारे अधिक वाढले. त्यापूर्वी प्रेम करत होत्या. परंतु या योजनेनंतर ते प्रेम अधिक वाढले आहे. तुम्ही माझ्या लडकी बहिणी आहेत. मी तुमची लडकी बहीण आहे. १८२५ दिवस सत्तेची माझ्याकडे आहे. त्यातील २२५ दिवस असेच जातील. उरलेल्या १६०० दिवसांत प्रत्येक दिवस मी विकास देईल. आता मी तसा निधी देऊ शकत नाही. कारण मी पर्यावरण मंत्री आहे. पशूसंवर्धन मंत्री आहे. परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

मी गडावर अनेक वर्षांपासून येत आहे. बाबांबरोबर या गडावर येत होते. तेव्हापासून अपवाद वगळता मी या गडावर आले. राजकारणात काम करणाऱ्यांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मात काम करणाऱ्यांनी राजकारणात येऊ नये. त्यांना धर्मात येयाचे असेल तर त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. भगवान बाबा यांच्या संदर्भात माझ्या मनात काय आहे? हे मी सांगू शकत नाही. ते माझ्यासोबत सदैव असतात. मी मंत्री आमदार, खासदार, नसताना जनतेने प्रेम दिले, असे पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा