AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Ravindra Chavan : भाजपं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अमित ठाकरेंबद्दल बोलताना राज ठाकरे चिडतील असे शब्द वापरले

BJP Ravindra Chavan : पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे गेले होते. त्यावेळी अमित ठाकरेंनी छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला असलेला पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला.

BJP Ravindra Chavan :  भाजपं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अमित ठाकरेंबद्दल बोलताना राज ठाकरे चिडतील असे शब्द वापरले
Ravindra Chavan-Raj Thackeray
| Updated on: Sep 02, 2026 | 9:50 AM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे सोमवारी पुण्यात एका कॉलेजमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवायला लावला. त्यांची ही कृती भाजपला अजिबात आवडली नाही. भाजपकडून अमित ठाकरेंवर टीका सुरु आहे. काल मुंबईत माहिम परिसरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरेंविरोधात आंदोलन केलं. यावेळी मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दादरमध्ये काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. अमित ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याचा भाजपं युवा मोर्चाचा हा निर्णय भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना अजिबात पटला नाही. त्यांनी महाराष्ट्र भाजपं युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

अमित ठाकरेंबद्दल बोलताना रविंद्र चव्हाण यांनी जे शब्द वापरले, त्यामुळे राज ठाकरे यांना नक्कीच राग येईल. ‘काल आलेला पोरगा काही तरी बोलतो आणि आपण त्या विरोधात आंदोलन करतो हे चुकीचे आहे’ असं रवींद्र चव्हाण म्हणाले. अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांनी नापसंती व्यक्त केली. “मला युवशक्तीला अडचणीत आणायचे नाही, आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे. गुंड म्हणून तयार करायचे नाही” असं रवींद्र चव्हाण म्हणाले. मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर व्यासपीठावरून चव्हाणांनी युवा मोर्चाला सुनावलं.

भाजपला ओपन चॅलेंज केलं

काल भाजपं युवा मोर्चाकडून माहिममध्ये अमित ठाकरेंविरोधात आंदोलन होणार असल्याचं समजल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी भाजपला ओपन चॅलेंज केलं. “मी संदीपला देशपांडेला भेटायला आलो आहे. हे जमलेले लोकं आहेत. बोलावलेले जमले तर शिवाजी पार्क कमी पडेल. भाजपं युवा मोर्चाला वाटत असेल शिवतीर्थ पर्यंत यावं तर त्यांचं वेलकम आहे” असं अविनाश जाधव म्हणाले.

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात काय घडलं?

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे गेले होते. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. ठाकरे यांनी कँटिनमध्ये मिळणारे जेवण आणि खेळाडूंना प्रशिक्षक मिळत नाही, त्यावरुन कॉलेजच्या अधीक्षक, मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावेळी एका विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याचे सांगितले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटो काढायला लावला.

Follow Us
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन