AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुलाच्या पोटी केरसुनी’, भाजप आमदाराने उद्धव ठाकरेंबद्दल वापरले वादग्रस्त शब्द

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटचा विकास व्हावा, यासाठी 368 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. अक्कलकोट एकमेव राज्यातील बस स्थानक आहे, ज्या ठिकाणी महिलांची राहण्याची सोय असणार आहे. अक्कलकोट बस स्टँडमधील भव्य दिव्य काम आता अंतिम टप्प्यात आहे. जिहादी वृत्तीच्या लोकांच्या डोळ्यात हे खूपत आहे. अक्कलकोटचे बस स्टँड हे बंदिस्त असलं पाहिजे"

'मुलाच्या पोटी केरसुनी', भाजप आमदाराने उद्धव ठाकरेंबद्दल वापरले वादग्रस्त शब्द
uddhav thackeray
| Updated on: Jun 20, 2025 | 11:55 AM
Share

“बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व देश हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा ही दुर्देवी बाब. गावाकडे आजी आमची म्हणायची, कोणी वारलं तर ते आपल्याकडे स्वर्गातून बघत असतात, त्याचप्रमाणे बाळासाहेब हे बघत असावेत, त्यांना किती वेदना होत असतील. आमच्याकडे एक म्हण आहे, मुलाच्या पोटी केरसुनी जन्माला येते असे आम्ही म्हणतो. आज देशात हिंदुत्वाच वातावरण तयार झालं आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी असं बोलणं हे दुर्देवाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. त्यांनी मताच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळणा बंद करावं” अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

“उद्धव ठाकरे यांना घरात बसायची वेळ भाजपमुळे आली आहे. लोकांनी 2024 ला त्याचा वाचपा काढला आणि भाजपला निवडून दिले. उद्धव ठाकरेंना रोज चार लोक सोडून जातात, त्यामुळे त्यांची मानसिकता खचली आहे. तुम्ही पण उद्धव ठाकरेंकडे जास्त लक्ष देऊ नका. उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या, आज त्यांच्या घरी कोणीही जात नाही. त्यामुळे आता भाजपचे माप काढण्यात वेळ वाया घालवू नये” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

संजय राऊत यांच्यासाठी 101 ब्राह्मण बोलवून पूजा घालू

“संजय राऊत हे अडचणीत आहेत. त्यांना काही पूजा करायची असेल, तर त्यांनी मला सांगावं. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना शांती तरी लागेल. महाविकास आघाडीतील नेत्यांना निवडून येण्याची शाश्वती नाही. संजय राऊत यांना जर चांगली पूजा घालायची असेल, तर मी त्यांना बगलामुखीची पूजा घालून देतो. संजय राऊत ज्या ठिकाणी सांगतील, त्या ठिकाणी पूजा करतो. शिवाजी पार्क किंवा आझाद मैदान असेल, त्यांना जिथे वाटते तिथे पूजा घालतो. संजय राऊत यांनाही चांगली सुबुद्धी यावी. पूजा करणं गरजेचं आहे. त्यासाठी 101 ब्राह्मण बोलवून आपण पूजा करू” असं संजय राऊत म्हणाले.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.