AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल नार्वेकरांचा पत्ता कट, कालिदास कोळंबकरांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ दिली. यामुळे आता राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे. 

राहुल नार्वेकरांचा पत्ता कट, कालिदास कोळंबकरांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती
कालिदास कोळंबकर राहुल नार्वेकर
| Updated on: Dec 06, 2024 | 1:53 PM
Share

महाराष्ट्रात सध्या देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राजभवनात कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामुळे आता राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजभवनावर त्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या निलम गोऱ्हे उपस्थितीत होत्या. येत्या 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी तीन दिवस मुंबईत विशेष अधिवेशन होणार आहे. या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येते. ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करणं गरजेचे असते. त्यानुसार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे.

आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षाची निवड होणार

आता 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशन दरम्यान कालिदास कोळंबकर हे विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

येत्या 7 डिसेंबरला तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सर्व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी उपस्थित राहण्याची सूचनाही देण्यात आली आहे. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षाची निवड होईल.

शपथ घेण्यापूर्वी कालिदास कोळंबकर काय म्हणाले?

मला पक्षाकडून हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार दुपारी १ वाजता मी राजभवनात जाऊन हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ  घेणार आहे. यानंतर पुढे मला विधानसभा अध्यक्ष म्हणून कायम ठेवायचे की नाही, याबद्दल पक्ष निर्णय घेईल. पण मी माझी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असं कालिदास कोळंबकर यांनी सांगितले.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?