मोठी बातमी! भाजप आमदार प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील कारला अपघात
मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या कारला अपघात झाला आहे. त्याचा ताफा जात असताना त्यांचा कारचा अपघात झाला.

मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला आहे.मुंबईतील फ्रीवेवरून त्यांचा ताफा जात असताना अपघात झाला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरेकरांच्या ताफ्यातील एका कार आणि टॅक्सीची धडक झाली. या अपघातात दोन्ही कारचे किरकोळ नुकसान झालं. अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. अपघातानंतर प्रवीण दरेकर देखील त्यांच्या कारमधून बाहेर आले.
मुंबईत गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाचे शेवटचे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे भाविकांची रस्त्यावर येजा पाहायला मिळत आहे. तर अनेकांकडून खासगी वाहन आणि टॅक्सी वाहनाचा वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्याचदरम्यान राजकीय नेतेही विविध गणेश मंडळांना भेटी देत आहेत. मुंबईत अनेक आमदार, मंत्री हे गणेशोत्सवानिमित्त मंडळांना भेटी देत आहेत. याचदरम्यान प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील एका कारचा अपघात झाला. भाजप आमदार दरेकरांच्या ताफ्यातील कारचा फ्रीवेवर अपघात झाल्याची माहिती हाती आली आहे. या अपघाताची तीव्रता कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील अपघात झाल्यानंतर व्हिडिओ समोर आला आहे. अपघात झाल्यानंतर प्रवीण दरेकर स्वत: पाहणी करण्यासाठी उतरले. त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सुरक्षारक्षक देखील होते. या व्हिडिओमध्ये प्रवीण दरेकरांचा प्रकृती व्यवस्थित असल्याचे दिसत आहे. त्यांच्या ताफ्यातील कार आणि टॅक्सीची धडक झाली, त्यामुळे ही घटना घडली. या घटनेत प्रवीण दरेकर हे सुखरूप आहेत. या अपघातानंतर दरेकरांच्या ताफ्यातील अनेक कारचं नुकसान झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर टॅक्सीचं देखील नुकसान झालं आहे. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली.
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारचा देखील अपघात झाला होता. त्यांच्या कारची धडक बसल्याने पादचारी जखमी झाला होता. त्यांचा चालक ही कार चालवत होता. विनातळावरून कांदिवलीच्या दिशेने जाताना विलेपार्लेमध्ये ही अपघाताची घटना घडली. या अपघातात सुनील धुलविया नावाचा पादचारी किरकोळ जखमी झाला. त्यानंतर सुनील धुलविया यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
