Sachin Ahir : सचिन अहिर फुटल्यानंतर भाजपं आमदाराची, ठाकरे गटात अजून काय घडणार त्या बद्दल सांगून जाणारी बोलकी प्रतिक्रिया

Sachin Ahir : दुसऱ्या पक्षातून येऊन आमदारकी दिली, त्याशिवाय वरळी विधानसभा क्षेत्रात ठाकरे गटाची ताकद आह. तळागाळात जनसंर्पक आहे. त्यामुळे सचिन अहिर फुटतील असं वाटलं नव्हतं.

Sachin Ahir : सचिन अहिर फुटल्यानंतर भाजपं आमदाराची, ठाकरे गटात अजून काय घडणार त्या बद्दल सांगून जाणारी बोलकी प्रतिक्रिया
Sachin Ahir-Uddhav Thackeray
| Updated on: Jun 30, 2026 | 1:15 PM

विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यात आज सकाळी अचानक एक मोठी ब्रेकिंग न्यूज आली. खरंतर महाराष्ट्राला आता राजकीय धक्के किंवा पक्षांतर अजिबात नवीन राहिलेलं नाही. पण आज सकाळची बातमी खरचं थोडी आश्चर्यकारक वाटली. कारण उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटून आठ दिवस होत नाहीत, तोच आता एक विधान परिषदेतला आमदार फुटल्याची बातमी आली. हे आमदार म्हणजे सचिन अहिर. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी खासदार आता आमदार. ठाकरे गटाला मानणाऱ्या शिवसैनिकांची अस्वस्थतता वाढवणारी ही बातमी आहे. यामुळे ठाकरे यांच्या पक्षातली अंतर्गत खदखद, अस्वस्थतता पुन्हा एकदा समोर आली आहे. सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेचं उपसभापती पद देण्यात आलं आहे.

सचिन अहिर हे ठाकरे कुटुंबाचे विश्वासू, निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. वरळी विधानसभा मतदारसंघात त्यांचा सतत आदित्य ठाकरेंसोबत वावर दिसायचा. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. दुसऱ्या पक्षातून येऊन आमदारकी दिली, त्याशिवाय वरळी विधानसभा क्षेत्रात ठाकरे गटाची ताकद आह. तळागाळात जनसंर्पक आहे. त्यामुळे सचिन अहिर फुटतील असं वाटलं नव्हतं. सचिन अहिर यांचं फुटणं हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी व्यक्तिगत पातळीवर मोठा धक्का आहे. कारण 2022 नंतर फुटलेला हा पहिला आमदार आहे.

प्रतिक्रिया खूपच बोलकी

कदाचित सचिन अहिर यांच्यानंतर अन्य आमदार सुद्धा वेगळी वाट पकडू शकतात. ठाकरे गटातील बरीच अंतर्गत नाराजी, मतभेद बाहेर येऊ शकतात. सचिन अहिर फुटल्यानंतर भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. ‘ये तो झाकी हैं त्यांचं बरच ऑपरेशन अजून बाकी आहे ‘ याच्या या वक्तव्याला बराच अर्थ आहे. कारण सध्याची ठाकरे गटाची स्थिती पाहता कधी, काय होईल याचा नेम नाही. मागच्या आठवड्यात सहाखासदार फुटून बाहेर पडले. त्यांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे पक्ष बांधणीचा प्रयत्न करत असताना आता एक आमदार फुटला आहे.

Follow Us