AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Ahir : मोठी बातमी, एकनाथ शिंदेंकडून पुन्हा उद्धव ठाकरेंचा गेम, सचिन अहिर फुटले

Sachin Ahir : खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा राजकीय झटका बसला आहे. ठाकरे कुटुंबाचा अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या नेत्याने कठीण काळात उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.

Sachin Ahir : मोठी बातमी, एकनाथ शिंदेंकडून पुन्हा उद्धव ठाकरेंचा गेम, सचिन अहिर फुटले
Sachin Ahir
| Updated on: Jun 30, 2026 | 1:14 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा एक मोठी घडामोड घडली आहे. आठ दिवसात शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा राजकीय धक्का दिला आहे.शिंदे सेनेने ठाकरे गटाला दिलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर फुटले आहेत. ठाकरे गटाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. सचिन अहिर यांनी विधानसभेत वरळी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा राजकीय झटका बसला आहे. विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर फुटले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना विधान परिषदेचं उपसभापती देण्यात आलं आहे.

सचिन अहिर हे वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत सतत सावलीसारखे दिसायचे. ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. पण सध्याच्या पक्षांतराच्या लाटेत त्यांनी कठीण काळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. सचिन अहिर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. शरद पवार यांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना मंत्रि‍पद, मुंबई अध्यक्षपद अशा विविध जबाबदाऱ्या दिल्या. अरुण गवळी यांचा भाचा अशी सचिन अहिर यांची ओळख होती. दक्षिण मुंबईचा भाग हा गिरणगाव म्हणून ओळखला जातो. इथे अनेक मिल्स होत्या. त्या मिल्सच्या युनियनच्या माध्यमातून काम करताना कामगार क्षेत्रातून सचिन अहिर यांनी राजकारणात प्रवेश केला.

ठाकरे गटातील अस्वस्थतता पुन्हा आली समोर

सचिन अहिर विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज दाखल करत असताना तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्मयंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे तिथे उपस्थित होते. खासदार फुटल्यानंतर आमदारही फुटणार अशी चर्चा होती. आता सचिन अहिर यांच्या रुपाने ठाकरे गटाच्या आमदारांच्या मनात असलेली अस्वस्थतता समोर आली आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा आमदार सुनील शिंदे यांनी पराभव केला. 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर शिवसेनेने सुनील शिंदे आणि सचिन अहिर या दोघांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...