राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला राज्यातील भाजपा खासदारांचा पाठिंबा, म्हणाले विरोध करणाऱ्या बृजभूषण यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल

| Updated on: May 16, 2022 | 2:32 PM

राजकीय मतभेद असले तरी त्याच्यावर वेगळ्या मार्गाने मात करता येणे शक्य आहे, असा सल्लाच त्यांनी यावेळी अयोध्येचे भाजपाचे खासदार बृजभूषण यांना दिला आहे. अयोध्या हा सगळ्या हिंदू समाजाच्या अस्तित्वादा मुद्दा असल्याचेही गोपाळ शेट्टी म्हणाले आहेत.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला राज्यातील भाजपा खासदारांचा पाठिंबा, म्हणाले विरोध करणाऱ्या बृजभूषण यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल
Shetty supoort Raj
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई – मनसे अध्यत्र राज ठाकरे (MNS Raj Thackeray)यांच्या अयोध्या (Ayodhya)दौऱ्याला जरी अयोध्येत भाजपा खासदार बृजभूषण सिंह हे विरोोध करत असले तरी राज्यातील भाजपाचे नेते मात्र राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पाठिंब्याच्या भूमिकेत दिसत आहेत. अयोध्येत कुणीही जावे, तिथे जाण्यापासून कुणालाही रोखण्यात येऊ नये, अशी भूमिका भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी (BJP MP Gopal Shetty)मांडली आहे. राजकीय मतभेद असले तरी त्याच्यावर वेगळ्या मार्गाने मात करता येणे शक्य आहे, असा सल्लाच त्यांनी यावेळी अयोध्येचे भाजपाचे खासदार बृजभूषण यांना दिला आहे. अयोध्या हा सगळ्या हिंदू समाजाच्या अस्तित्वादा मुद्दा असल्याचेही शेट्टी म्हणाले आहेत.

बृजभूषण यांचा वाढता विरोध

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी अयोध्येत बृजभूषण सिंह यांनी गेल्या काही दिवसांपासून मोहीमच राबवली आहे. . प्रदेशात प्रत्येक शहराशहरात ते यासाठी फिरत आहेत. राज ठाकरेंनी परप्रातियांच्या मुद्द्यावर केलेल्या आंदोलनाबाबत माफी मागावी अशी त्यांची मागणी आहे. माफी मागितली तरच त्यांना अयोध्या एयरपोर्टवर प्रवेश मिळेल, अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली आहे. याबाबतची पोस्टर्स, साधू संतांच्या भेटी तसेच दररोजची प्रक्षोभक विधानेही ते करत आहेत. ही पक्षाची नव्हे तर आपली भूमिका आहे हेही ते सातत्याने सांगत आहेत.

बृजभूषण यांच्याबाबत पक्ष योग्य निर्णय करेल – शेट्टी

त्यांच्याबाबत विचारले असता बृजभूषण यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे सांगत गोपाळ शेट्टी यांनी बृजभूषण यांच्यावर कारवाई होईल वा योग्य वेळी शांत करण्यात येईल असे संकेतच दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

मनसेचेही टोचले कान

भारत हा देश आहे हेही खरे आहे, एका राज्यातील जनतेने दुसऱ्या राज्यातील लोकांचा आदर केला पाहिजे, हिंसाचार अजिबात होता कामा नये, पण कधी कधी काही घडले तर त्याची जाणीव करून दिली पाहिजे. असे मतही गोपाळ शेट्टी यांनी मांडले आहे.

राज ठाकरे यांचे मात्र मौन

अयोधेयेचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह हे सातत्याने मनसे आणि राज ठाकरे यांना डिवचणारी विधाने करत असले, तरी याबाबत राज ठाकरे यांनी मौन बाळगले आहे. मध्यंतरीच्या काळात याबाबत पक्षातीही कुणीही शहाणपणा करुन भूमिका मांडू नये, असे ताकीद देणारे पत्रही त्यांनी काढले आहे. थोडक्यात या दौऱ्यापूर्वी भाजपा बृजभूषण यांना शांत करेल, असा विश्वासही राज यांना असण्याची शक्यता आहे.