तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकून येईल, भाजप खासदाराचा दावा

राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी केडीएमसीत भाजपचं सरकार येईल, असा दावा खासदार कपिल पाटील यांनी केला आहे (MP Kapil Patil says BJP will win KDMC election)

तीन काय 30 पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकून येईल, भाजप खासदाराचा दावा
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 6:13 PM

ठाणे : कल्याण-डोबिंवली महापालिका निवडणूक आता तोंडावर आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात या महापालिकेची निवडणूक होऊ शकते. या निवडणुकीत भाजपच जिंकून येणार, असा दावा खासदार कपिल पाटील यांनी केला आहे. “राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी केडीएमसीत भाजपचं सरकार येईल. केडीएमसी निवडणुकीत तीन काय तीस पक्षही एकत्र आले तरी भाजपच जिंकून येईल”, असा दावा त्यांनी व्यक्त केला (MP Kapil Patil says BJP will win KDMC election).

कल्याणमधील भाजपचे पदाधिकारी निलेश शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला (MP Kapil Patil says BJP will win KDMC election).

राज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा प्रचंड तापलाय. या मुद्द्यावरुन भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेलरण्याचा प्रयत्न केला आहे. याच मुद्द्यावरुन कपिल पाटील यांनीदेखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “राज्यात सध्या खिचडी सरकार असल्याने संभाजीनगर हे नाव दिलं जाईल, असं मला वाटत नाही”, असा टोला त्यांनी लगावला.

केडीएमसीत भाजप-मनसे एकत्र येणार?

केडीएमसी निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येणार का याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या मुद्द्यावरही खासदार कपिल पाटील यांनी भाष्य केलं. “मनसेने उत्तर भारतीयांचा मुद्दा सोडला तर भाजप आणि मनसेची युती होऊ शकते”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

केडीएमसीचं सध्याचं पक्षीय बलाबल काय?

केडीएमसीत सध्या 122 प्रभाग आहेत. 11 नोव्हेंबर 2020 रोजी महापालिकेच्या सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. 12 नोव्हेंबरपासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रभाग रचना सोडत होणार होती. मात्र त्याआधी 18 गावांविषयी उच्च न्यायालयाचा निकाल आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

केडीएमसीच्या 122 प्रभागांमध्ये सध्या कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांचा समावेश आहे. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयावर केडीएमसीची प्रभाग रचना ठरणार आहे. दरम्यान, केडीएमसीत गेल्या पाच वर्षात 122 जागांपैकी 52 जागा शिवसेना, 42 जागा भाजप, 4 जागा काँग्रेस, 2 जागा राष्ट्रवादी, 1 जागा एमआयएम, 9 जागा मनसेकडे तर 10 अपक्ष होते.

गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र, आता ही युती नाही. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजप आणि मनसेची युती होऊ शकते.

शिवसेनेसोबत राष्ट्रवादी, काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याने सेनेला हिंदूत्ववादी मतांचा फटका बसू शकतो. भाजप आणि मनसेची युती झाली तर भाजपला उत्तर भारतीय मतांचा फटका बसू शकतो. कारण मनसेला उत्तर भारतीयांची मते मिळणार नाहीत. येणाऱ्या काळात किती प्रभाग होतात. त्यानुसार निवडणूक होईल. मात्र कल्याण डोंबिवली शिवसेनाचा बालेकिल्ला राहिला आहे. यात भाजप आणि मनसे सत्ताबदल करू शकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.